सामाजिक

 उद्या मातोश्री भिमाई व्याख्यानमालेचे आयोजन.

मुखेड / प्रतिनिधी. श्रमिक एकता ०९ मार्च २६

    मातोश्री भिमाई पांडुरंगराव पुंडे व्याख्यानमाला तसेच गुरुवर्य पांडुरंगराव पुंडे स्मृती पुरस्कार प्रदान सोहळ्याचे दि.१० मार्च रोजी सायंकाळी ०६ वाजता शांतीनगर मुखेड येथे आयोजन करण्यात आलेआहे.याप्रसंगी महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध व्याख्याते गारगोटी (कोल्हापूरयेथील युवराज पाटील यांचे ‘चलाकुटुंब जपूया’ या विषयावर व्याख्यान होणार असून व्याख्यानमालेचे १४ वे पुष्प पाटील गुंफणार आहेत

     कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रीक्षेत्र येवती मठसंस्थानचे मठाधिपती सदगूरू नराशाम महाराज हे राहणार असून आमदार डॉ.तुषार राठोडनगराध्यक्ष विजया देबडवार यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.या शानदार सोहळ्यात ‘ग्लोबल एक्सपर्ट इमर्जन्सी मेडिकल फोर्टिस हॉस्पिटल मुलुंड,मुंबई‘ येथीलडॉ.संदीप बालनराव गोरे यांना ‘गुरुवर्य पांडुरंगराव पुंडे स्मृती पुरस्कार‘ प्रदान करण्यात येणार आहेमुखेड भूषण डॉ.दिलीपराव पुंडे यांच्या पुढाकारातून मातोश्री भिमाई व्याख्यानमाला सातत्याने सामाजिकसांस्कृतिक,आरोग्य  वैचारिक प्रबोधनाचे कार्य करत आहेयापूर्वी या व्याख्यानमालेत तेरा व्याख्यान पुष्पे यशस्वीपणे संपन्न झाली आहेत.पहिल्या पुष्पात कवी प्रा.प्रशांत मोरे (मुंबईयांनी ‘आई’ याविषयावर व्याख्यान दिले,दुसरे पुष्प प्राचार्य डॉ.यशवंत पाटणे यांनी ‘सुंदर जगण्यासाठी’, तर तिसरे पुष्पडॉ.राजेंद्र पवार यांनी ‘सुजाण पालकत्व’ या विषयावर गुंफले.,चौथे पुष्प प्रा.डॉ.तेज निवळीकर यांनी२१व्या शतका समोरील आव्हाने’ या विषयावर,पाचवे पुष्प डॉरामचंद्र देखणे यांनी ‘ज्ञानदेवे रचिला पायातुका झालासे कळस’ या विषयावर सादर केले,सहावे पुष्प डॉ.अविनाश सावजी अमरावती यांनीशतायुषी व्हापासवर्ड आरोग्याचा’, तर सातवे पुष्प डॉसचिन देशमुख औरंगाबाद यांनी ‘स्वभावालाही औषध असतं’ या विषयावर गुंफले.,आठवे पुष्प जगन्नाथ दीक्षित औरंगाबाद यांनी ‘विनासायास वेटलॉस’, नववे पुष्प डॉ.श्रीराम राठोड नांदेड  माजी आयुक्त आर.केगायकवाड यांनी ‘विपश्यना : परिचयव अनुभूती’ या विषयावर सादर केले,दहावे पुष्प प्राचार्य डॉ.यशवंत पाटणे यांनी ‘जीवन त्यांना कळले हो’, अकरावे पुष्प इंद्रजीत देशमुख (कराडयांनी ‘पसायदान’ या विषयावर गुंफले,बारावे तपपूर्ती पुष्पडॉ.अनंत सूर्यवंशी (नांदेड डॉ.गौरव दिलीप पुंडे (मुखेडयांनी ‘हृदयरोग जनजागरण अभियान’ याविषयावर सादर केले तर तेरावे पुष्प प्रा.श्रीहरी वेदपाठक (लातूरयांनी ‘ताणतणावाचे व्यवस्थापन’ याविषयावर गुंफले.याच परंपरेत मंगळवारी होणाऱ्या कार्यक्रमात युवराज पाटील यांचे ‘चला कुटुंब जपूया’ हे व्याख्यान समाजाला सकारात्मक दिशा देणारे ठरणार आहे.आधुनिक जीवनशैलीत कुटुंबव्यवस्था,नातेसंबंध  मूल्यांचे जतन कसे करावेयावर ते मार्गदर्शन करणार आहेत.या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहून व्याख्यानपुष्पाचा लाभ घ्यावाअसे आवाहन व्याख्यानमाला संयोजन समितीचे प्रमुख मुखेड भूषण डॉ.दिलीपराव पुंडे,सौमाला पुंडे,संजय पुंडे,डॉ.गौरव पुंडे,डॉ.तेजस्विनी पुंडेतसेच संयोजन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button