सामाजिक

श्रमिक एकता न्यूजचा दणका! रस्त्यावर वाहणाऱ्या घाण पाण्याचा प्रश्न सुटला; मुख्याधिकारी जाधव यांची तात्काळ कारवाई

मुखेड प्रतिनिधी: श्रमिक एकता न्यूज दि १० मार्च २६

येथील प्रभाग क्रमांक ९ मधील परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून नाल्यातील घाण पाणी रस्त्यावर वाहत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले होते. या संदर्भात ‘श्रमिक एकता न्यूज’ ने सविस्तर वृत्त प्रसिद्ध करून प्रशासनाचे लक्ष वेधले होते. या बातमीची प्रशासकीय स्तरावर मोठी दखल घेण्यात आली असून, मुख्याधिकारी जाधव यांनी तातडीने आदेश देऊन नाल्याची साफसफाई सुरू केली आहे.

संबंधित प्रभागातील नाली तुंबल्यामुळे सांडपाणी रस्त्यावर साचत होतेयामुळे परिसरात दुर्गंधी पसरलीहोती आणि डेंग्यूमलेरिया सारख्या आजारांची भीती निर्माण झाली होतीस्थानिक नागरिकांनी अनेकदातक्रारी करूनही पालिका प्रशासनाकडून दुर्लक्ष केले जात होते.

मुख्याधिकाऱ्यांच्या आदेशानंतर तातडीने सफाई कामगारांच्या मदतीने नाल्यातील गाळ काढण्याचे कामसुरू झाले आहेसाचलेले पाणी उपसून काढण्यात येत असूनपुन्हा पाणी रस्त्यावर येणार नाही याचीदक्षता घेण्याच्या सूचना जाधव यांनी न पा विभागाला दिल्या आहेत.

मुख्याधिकारी जाधव यांनी यावेळी स्पष्ट केले कीशहराच्या स्वच्छतेच्या बाबतीत कोणतीही हलगर्जीखपवून घेतली जाणार नाहीतसेच नागरिकांनीही नाल्यात कचरा टाकू नयेअसे आवाहन त्यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button