बीएलओचे अथक परिश्रम: मुखेडमध्ये ७८% ‘मॅपिंग’ पूर्ण; उर्वरित २२% मतदारांनी तातडीने नोंदणी करा.

▫️ उपविभागीय अधिकारी अनुप पाटील यांचे आवाहन
मुखेड (प्रतिनिधी): श्रमिक एकता न्यूज़ ३० मार्च २६
भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार महाराष्ट्र राज्यात एप्रिल २०२६ मध्येमतदार याद्यांचा विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम (SIR) सुरू होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर, ९१–मुखेड विधानसभा मतदारसंघातील सर्व मतदारांनी आपल्या सध्याच्या मतदार यादीतील नावाची, सन२००२ मध्ये झालेल्या विशेष संक्षिप्त पुनरिक्षणाच्या अंतिम यादीतील नावाशी ‘मॅपिंग’ (Mapping)करून घ्यावी, असे आवाहन देगलूरचे उपविभागीय अधिकारी तथा मतदार नोंदणी अधिकारी अनुप पाटील यांनी केले आहे.
मुखेड विधानसभा मतदारसंघात एकूण ३६६ मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) नियुक्त करण्यातआले आहेत. या कामासाठी बीएलओना त्यांच्या मूळ कर्तव्यातून २४ दिवसांची सुटी देण्यात आली असून, त्यांनी आतापर्यंत ७८ टक्के मतदारांच्या नावाचे मॅपिंग पूर्ण केले आहे. मात्र, अद्याप २२ टक्के मतदारांचेकाम प्रलंबित आहे.
मतदारांसाठी महत्त्वाच्या सूचना:
▫️प्रलंबित २२ टक्के मतदारांनी संपर्क साधावा: ज्या मतदारांचे मॅपिंग अद्याप झालेले नाही, त्यांनीतातडीने आपल्या संबंधित बीएलओशी संपर्क साधावा.
▫️विवाहित महिलांसाठी विशेष सूचना: विवाहित महिलांनी त्यांच्या माहेरच्या गावातील आई, वडील, भाऊ किंवा आजी–आजोबांच्या २००२ च्या यादीतील ‘भाग क्रमांक’ व ‘अनुक्रम’ आपल्या सासर कडील बीएलओकडे देऊन मॅपिंग करून घ्यावे.
▫️इतर दुरुस्त्या: मतदार यादीतील अस्पष्ट फोटो बदलणे, मयत मतदारांची नावे वगळणे ही कामे ही सध्या बीएलओमार्फत केली जात आहेत.
यावेळी तहसीलदार राजेश जाधव, नायब तहसीलदार सतीश जोहरे, प्र. सहाय्यक महसूल अधिकारी संदीप भुरे, सुनील कुलकर्णी (लिपीक) आणि डाटा एन्ट्री ऑपरेटर बबलू अत्तार उपस्थित होते. सर्वनागरिकांनी लोकशाही बळकट करण्यासाठी या प्रक्रियेत सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासना तर्फे करण्यात आले आहे.



