क्राईम
सावधान! ‘डिजिटल अरेस्ट’चा विळखा: मुंबईतील तरुणीला ३२ लाखांचा गंडा; नांदेडचे ४ तरुण अटकेत

नांदेड प्रतिनिधी:- श्रमिक एकता न्यूज़ ३० मार्च २६
डिजिटल अरेस्टच्या नावाखाली मुंबईतील २१ वर्षीय तरुणीला दहशतवादाशी संबंध असल्याची भीती दाखवून ३२ लाख ६९ हजार ९९७ रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी नांदेडच्या चार तरुणांना अटक करण्यात आली आहे.
आरोपींनी स्वतःला पोलीस अधिकारी असल्याचे भासवत व्हिडिओ कॉलद्वारे तरुणीला चार दिवस ‘डिजिटल अरेस्ट’मध्ये ठेवले. बनावट कागदपत्रे दाखवून ‘तपासासाठी’ पैसे आरबीआय खात्यात जमा करण्यास भाग पाडले.
मुंबई पोलिसांनी तांत्रिक तपासातून नांदेडमधील निलेश वासमवार, शुभम जोगदंड, अजय भोसले आणि सिद्धांत जोंधळे यांना अटक केली. हे आरोपी इतर सायबर गुन्ह्यांतही सक्रिय असल्याची शक्यता असून, मोठ्या रॅकेटचा शोध सुरू आहे.



