सामाजिक

नांदेड जिल्ह्याला चार दिवस ‘यलो अलर्ट’; विजेच्या कडकडाटासह पावसाची शक्यता!

नांदेड प्रतिनिधी :- श्रमिक एकता न्यूज़. 30 मार्च २६

प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्रमुंबई यांनी ३० मार्च रोजी दिलेल्या सूचनेनुसार नांदेड जिल्ह्यासाठी ३०  ३१ मार्च २०२६ तसेच १  ३ एप्रिल २०२६ या दोन दिवसांसाठी यलो अलर्ट जारी केलेला आहेहे चार दिवस जिल्ह्यात तुरळक ठिकाणी ताशी ४० ते ५० किमी वेगाने वादळी वारे वाहण्याचीविजेच्या कडकडाटासह  ढगांच्या गडगडाटासह मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची अधिकशक्यता वर्तविली आहेया नैसर्गिक आपत्ती संदर्भात सर्व संबंधित यंत्रणा आणि नागरिकांनी खबरदारीघ्यावी असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे

विजेच्या गडगडाटासह पावसाची पूर्वकल्पना असल्यास बाहेर जाणे टाळाजर मोकळ्या जागेत असालआणि जवळपास कुठल्याही सुरक्षित इमारतीचा आसरा नसेल तर सखल जागेत जाऊन गुडघ्यात डोकेघालून बसाआकाशात विजा चमकत असल्यास घरात किंवा सुरक्षित इमारतीत आश्रय घ्याघराच्या बाल्कनीछत अथवा घराबाहेरील ओट्यावर थांबू नकाआपण घरात असाल आणि घरातील विद्युतउपकरणे चालू असतील तर त्या वस्तू त्वरित बंद करातारांचे कुंपणविजेचे खांब  इतर लोखंडी वस्तूंपासून दूर रहापाण्यात उभे असाल तर तात्काळ पाण्यातून बाहेर पडा.

आकाशात विजा चमकत असल्यास घरातील लँडलाईन फोनचा वापर करू नकाशॉवरखाली अंघोळकरू नकाघरातील बेसिनचे नळपाण्याची पाईपलाइन यांना स्पर्श करू नका तसेच कुठल्याही विद्युत उपकरणांचा वापर करू नकाविजेच्या गडगडाटासह वादळी वारे चालू असताना लोखंडी धातूच्यासहाय्याने उभारलेल्या तंबूमध्ये किंवा शेडमध्ये आसरा घेऊ नकाउंच झाडाच्या खाली आसरा घेऊ नकाधातूंच्या उंच मनोऱ्या जवळ उभे टाकू नकाजर आपण घरात असाल तर उघड्या दारातून अथवा खिडकीतून वीज पडताना पाहू नकाहे बाहेर थांबण्याइतकेच धोकादायक आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button