बांगड्या विकणाऱ्या चा मुलगा जमीर शेखची “धर्मदाय निरीक्षक” पदासाठी निवड.

मुखेड / प्रतिनिधी. श्रमिक एकता न्यूज़ ०४ एप्रिल २६
तालुक्यातील मौजे चांडोळा येथील बांगड्यांचे व्यवसायिक रहिमोद्दीन शेख यांचा मुलगा जमीर रहिमोदीन शेख यांनी अथक परिश्रम,जिद्द,चिकाटी आणी अभ्यासाच्या जोरावर महाराष्ट्र शासनाच्या धर्मादाय आयुक्त कार्यालय मार्फत घेण्यात आलेल्या (गट–ब) परीक्षेमध्ये ईडब्लूएस प्रवर्गातून राज्यात दुसरा क्रमांक पटकावत ‘धर्मदाय निरीक्षक‘ पदाला गवसणी घातली आहे.या यशाबद्दल जमीरचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
तालुक्यातील मौजे चांडोळा येथील रहिवासी असलेले रहीमोद्दीन शेख हे चांडोळा व परिसरातील गावामध्ये बांगड्या विक्री करण्याचा व्यवसाय करून आपल्या कुंटुबांचा उदरनिर्वाह चालवीतात त्यांची घरची परिस्थिती अंत्यत हलाखीची असुन त्यांनी आपल्या व्यवसावरच कुटुंबाचा गाडा चालवत लेकरांना शिक्षण देण्याचे कार्य पाडले आहे.आपला मुलगा सरकारी अधिकारी किंवा कर्मचारी व्हावे म्हणून त्यांनी दिवसरात्र मेहनत करत शिक्षणामध्ये लेकरांना सपोर्ट केले.जमीर शेख याने आई–वडिलांच्या कष्टाची त्यांच्या परिश्रमाची जाण ठेवत आपले ध्येय व स्वप्न पूर्ण करण्यासाठी अभ्यासात सातत्य ठेवत,अथक परीश्रम घेवुन जिद्द आणी चिकाटीच्या जोरावर महाराष्ट्र शासनाच्या धर्मादाय आयुक्त कार्यालय मार्फत घेण्यात आलेल्या (गट–ब) परीक्षेमध्ये ईडब्लूएस प्रवर्गातून राज्यात दुसरा क्रमांक यण्याचा बहुमान पटकावत ‘धर्मदाय निरीक्षक‘ पदाला गवसणी घातली आहे.जमीर शेख यांची धर्मदाय निरीक्षक म्हणुन निवड झाल्याची बातमी शेख परिवारातील सदस्यांना व मित्रपरिवार यांना कळताच सर्वत्र आंनदाचे वातावरण पसरले.या यशाबद्दल जमीरचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.



