क्राईम

लाकूड माफियांसमोर प्रशासन हतबल की सामील? मुखेड तालुक्यात निसर्गाचा गळा घोटण्याचा प्रकारसुरूच!

मुखेड (प्रतिनिधी): श्रमिक एकता न्यूज़ ११ एप्रिल २६

मुखेड तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर अवैध लाकूडतोड सुरू आहेनिसर्गाचा समतोल राखणारे जुने आणि मोठे वृक्ष दिवसा ढवळ्या तोडले जात असूनलाकूड माफियांनी तालुक्यात उच्छाद मांडला आहेविशेष म्हणजेया गंभीर विषयावर ‘श्रमिक एकता न्यूज’ ने वारंवार बातम्या प्रसिद्धकरून आणि संबंधित विभागाकडे लेखी तक्रारी करूनही प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई केली जात नसल्याने संताप व्यक्त केला जात आहे.

तालुक्यातील ग्रामीण आणि डोंगराळ भागात रात्रीच्या अंधारात तसेच आता तर थेट दिवसाही ट्रॅक्टर आणि ट्रक भरून लाकडाची अवैध वाहतूक केली जात आहेतोडलेल्या लाकडांमध्ये प्रामुख्याने मौल्यवान झाडांचा समावेश असूनयामुळे पर्यावरणाचे कधीही भरून  निघणारे नुकसान होत आहे.

या संदर्भात अनेकवेळा पुराव्यासह बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेतसामाजिक कार्यकर्त्यांनी आणि सजगनागरिकांनी लेखी निवेदने दिली आहेतमात्रवनविभागाचे अधिकारी आणि कर्मचारी याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करत असल्याचे चित्र दिसत आहे“तक्रार करूनही फरक पडत नसेल, तर या लाकूड माफियांचे आणि अधिकाऱ्यांचे काही ‘अर्थपूर्ण’ संबंध आहेत का?” असा टोकदार सवाल आता जनतेतून विचारला जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button