क्राईम

मुखेडमध्ये अल्पवयीन मुले अंमली पदार्थांच्या विळख्यात; वारंवार तक्रारींनंतरही प्रशासन ‘निद्रावस्थेत’!

मुखेड (प्रतिनिधी): श्रमिक एकता न्यूज़ १६ एप्रिल २६

मुखेड शहरात सध्या अंमली पदार्थांचाविशेषतः गांजाचा विळखा घट्ट होत चालला असूनशाळेत जाणाऱ्या अल्पवयीन मुलांचे भविष्य उद्ध्वस्त होत आहेया गंभीर विषयावर स्थानिक माध्यमांनी वारंवार आवाज उठवून आणि बातम्या प्रसिद्ध करूनहीसंबंधित प्रशासन आणि पोलीस विभाग अद्याप ढिम्म असल्याचे दिसून येत आहेप्रशासनाच्या या उदासीनतेमुळे पालकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

शहरातील काही निर्जन स्थळेअर्धवट बांधलेली घरे आणि सार्वजनिक बागा,स्मारक परिसर आताव्यसनी टोळ्यांचे अड्डे बनत चालले आहेतधक्कादायक बाब म्हणजे१० ते १६ वयोगटातील मुले याव्यसनाच्या आहारी जात आहेतशहरात गांजा येतो कुठूनआणि तो या लहान मुलांपर्यंत पोहोचवणारे मुख्य सूत्रधार कोणअसा सवाल आता उपस्थित केला जात आहे.

अंमली पदार्थ विक्रेते जाणीवपूर्वक शाळेतील आणि कॉलेजमधील मुलांना जाळ्यात ओढत आहेत.

अनेक वेळा बातम्या प्रसिद्ध होऊनही पोलिसांनी अद्याप एकही मोठी ठोस कारवाई केलेली नाही.

आपल्या मुलांच्या भविष्याबद्दल पालकांमध्ये प्रचंड भीती आणि असुरक्षिततेची भावना आहे.

प्रशासनाला जाग येण्यासाठी अजून किती मुलांचे आयुष्य उद्ध्वस्त होण्याची वाट पाहिली जात आहे? ‘अंमली पदार्थ मुक्त मुखेडच्या केवळ घोषणाच होणार की प्रत्यक्ष कारवाईअसे तिखट प्रश्न नागरिक विचारत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button