सामाजिक

अनधिकृत होर्डिंगबाजांचे धाबे दणाणले! नांदेड शहर ‘फ्लेक्समुक्त’ करण्यासाठी प्रशासनाची वज्रमूठ

नांदेड प्रतिनिधी:- श्रमिक एकता न्यूज़ १६ मे २६

 नांदेड शहरातील अनधिकृत होर्डिंग्सवर धडक कारवाई करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील नियोजन भवन येथे सर्वपक्षीय नेतेलोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण संयुक्त बैठक संपन्न झालीया बैठकीस महापौर सौ.कविता संतोष मुळेजिल्हाधिकारी राहुल कर्डीलेपोलीस अधीक्षक अबिनाश कुमारमहानगरपालिका आयुक्त डॉ.महेश कुमार डोईफोडेनिवासी उपजिल्हाधिकारी किरण अंबेकरपोलीस उपविभागीय अधिकारी व्यंजनेप्रशांत शिंदे त्याचप्रमाणे उपमहापौर दिपकसिंह रावतस्थायी समिती सभापती विरेंद्रसिंग गाडीवालेमहिला बाल कल्याणसभापती सदिच्छा सोनी पाटील,अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम,अतिरिक्त आयुक्त निलेश संकेवारउपायुक्त .अजितपालसिंग संधु सर्वपक्षीय नेते आणि विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी होते.

बैठकीच्या प्रारंभी महापालिकेच्या वतीने राज्य शासनाने निर्देशीत केल्याप्रमाणे  माननीय उच्चन्यायालयातील जनहित याचिका क्र.१५५/२०११ मधील दिनांक ३१.०१.२०१७ रोजीच्या आदेशानुसार आकाशचिन्ह  जाहिरात विनियम  नियंत्रण कार्यपध्दती संदर्भात सादरीकरण करण्यात आलेशहरातील वाढती बॅनरबाजी रोखण्यासाठी मनपा आणि पोलीस दल मिळून अनधिकृत होर्डिंग्सवर संयुक्तपणे निष्कासन कारवाई करणार आहेकारवाई दरम्यान मनपा कर्मचाऱ्यांना पूर्ण पोलीस संरक्षण देण्याचे पोलीस अधीक्षकांनी यावेळी आश्वासन दिले आहेतसेच विनापरवाना होर्डिंग लावणाऱ्यांवर आणि संबंधितावर थेट फौजदारी गुन्हे (FIR) दाखल होणार आहेत.कायदेशीर होर्डिंग्सचे देखील सुरक्षिततेच्या दृष्टीने तातडीने स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे आदेश यावेळी देण्यात आलेशहरात पालिकेनेएकुण १६७ अधिकृत जाहिरात फलक उपलब्ध करुन दिले आहेतत्याप्रमाणे अनधिकृत मोठ्या होर्डींग्सवर दंड आकारण्याचे धोरण आखण्यात येणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button