देगलूरमध्ये शेतकऱ्यांचा एल्गार! पीक विमा आणि खत-बियाणांसाठी उपजिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे आंदोलन

देगलूर (प्रतिनिधी): श्रमिक एकता न्यूज़ १५ मे २६
“पीक विमा आमचा हक्क आहे, भीक नाही!” अशी गर्जना करत आज देगलूर तालुक्यातील शेतकरी आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. प्रलंबित पीक विमा तात्काळ मिळावा आणि आगामी खरीपहंगामासाठी खते–बियाणांचा पुरवठा सुरळीत व्हावा, या मागण्यांसाठी कैलास येसंगे कावळगावकरयांच्या नेतृत्वाखाली उपजिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे आंदोलन करण्यात आले.

या आंदोलनात विशेषतः मरखेल, देगलूर आणि खानापूर या तीन महसूल मंडळातील शेतकऱ्यांनी आणितरुणांनी मोठी गर्दी केली होती. पीक विमा मंजूर होऊनही तो अद्याप खात्यावर जमा न झाल्याने शेतकऱ्यांमध्ये प्रशासना प्रति तीव्र संताप व्यक्त केला जात होता.
आंदोलनाची तीव्रता पाहून नायब तहसीलदार तेलंग साहेब यांनी पुढाकार घेतला. त्यांनी तत्काळ कृषीअधिकारी आणि पीक विमा कंपनीच्या प्रतिनिधींची बैठक बोलावली. या बैठकीत विमा कंपनीला स्पष्टनिर्देश देऊन, पुढील आठवड्यात उर्वरित पीक विमा वितरित करण्याचे आदेश प्रशासनाकडून देण्यात आले.

आंदोलकांनी प्रशासनासमोर खालील प्रमुख मागण्या मांडल्या:
१ वंचित शेतकऱ्यांना तात्काळ पीक विम्याचे वाटप व्हावे.२ बाजारात खते व बियाणांची निर्माण होणारी ‘कृत्रिम टंचाई’ थांबवावी.३ शेतकऱ्यांना योग्य दरात खत–बियाणे उपलब्ध करून देण्यासाठी विशेष दक्षता पथक नेमावे.
याप्रसंगी प्रसारमाध्यमांशी बोलताना आंदोलकांनी आपली परखड भूमिका मांडली. “शेतकऱ्यांच्यासहनशीलतेचा अंत पाहू नका. जर दिलेल्या मुदतीत विमा मिळाला नाही आणि खतांचा काळाबाजारथांबला नाही, तर येणाऱ्या काळात हे आंदोलन अधिक तीव्र होईल,” असा इशारा यावेळी देण्यात आला.
या आंदोलनामुळे प्रशासकीय यंत्रणेची मोठी धावपळ उडाली असून, आता शेतकऱ्यांचे लक्ष पुढीलआठवड्यात होणाऱ्या विमा वितरणाकडे लागले आहे.



