सामाजिक

मुखेड येथे शिवराज्याभिषेक सोहळ्याला बहुजनांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

मुखेड प्रतिनिधी:- श्रमिक एकता न्यूज़ ०६ जून २६

छत्रपती शिवाजी महाराजांच्या ऐतिहासिक शिवराज्याभिषेक सोहळ्याचे औचित्य साधून दरव–र्षीप्रमाणेयाही वर्षी ६ जून रोजी राजमुद्रा सामाजिक संघटनेच्या वतीने भव्य आणि उत्साही कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. मुखेड येथील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक येथे शनिवार सकाळी १०.३० वाजता शिवप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावत अभूतपूर्व उत्साहात राज्याभिषेक सोहळा साजरा केला. याकार्यक्रमाला राजमुद्रा संघटनेचे युवा तरुन  शिवप्रेमी बांधव यांच्या सह जयप्रकाश कानगुले (नगरसेवकप्र ), सदानंद पाटील जाधव, शरद पाटील जाधव, शिवाजी गेदेवाड, नरेश इंगोले.शाम इंगोले ,मनोज इंगोले , कपिल काटेवाडे, बालाजी पा इंगोले सुरज जाधव, योगेश जाधव, विरभद्र स्वामी, विट्टल जामदार,  सचिन चिखलीकर, पपु पा पाटोदे, दत्ता गजलवाड, अज्ञान पाशा, वैभव इंगळे, साई भोसले, सोहम भिसे, हराळे मामा, वैभव बोडके, यांची उपस्थिती लाभली. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी राजमुद्रा सामाजिक संघटनेचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, तसेच मुखेड–कंधार विधानसभा क्षेत्रातील बहुजन बांधवांनी मोलाची साथ दिली. या सोहळ्याने परिसरात राष्ट्राभिमान आणि शिवप्रेमाचे नवे जागरण घडवले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संयोजन समितीने केलेअसून, उपस्थित पाहुण्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचा गौरव करत, युवापिढीने शिवाजी महाराजांचा आदर्श घेण्याचे आवाहन राजमुद्रा संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे..

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button