सामाजिक

शीख समाजाच्या संवैधानिक हक्कांचा प्रश्न आता लोकसभेत; दीपक सिंह हुजुरीयांचे विरोधी पक्षनेत्यांना साकडे

नांदेड प्रतिनिधी:- श्रमिक एकता न्यूज़ १९ जून २६

नांदेड येथील गुरुद्वारा बोर्डाच्या कारभारातील कथित अनियमितता आणि शीख समाजाच्या विविध प्रलंबित प्रश्नांवरून स्थानिक पातळीवरील राजकीय आणि धार्मिक वातावरण तापण्याची शक्यता निर्माण झाली आहेनांदेड येथील काँग्रेस कार्यकर्ते दीपक सिंह हुजुरीया यांनी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना थेट पत्र लिहून हे मुद्दे आगामी संसद अधिवेशनात मांडण्याची मागणी केलीआहे.

हुजुरीया यांनी पाठविलेल्या पत्रात स्थानिक स्तरावर शीख समाजाच्या संवैधानिक हक्कांचे उल्लंघन होत असल्याचा गंभीर दावा केला आहे. ‘नांदेड शीख गुरुद्वारा सचखंड श्री हजूर अपचल नगर ॲक्ट १९५६‘ अंतर्गत असलेल्या बोर्डाच्या विद्यमान रचनेबाबत आणि त्यावरील नियुक्त्यांबाबत त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले असूननांदेड गुरुद्वारा बोर्डाची तातडीने रीतसर स्थापना करण्यासाठी प्रयत्न करावेतअसे आवाहन राहुल गांधी यांना केले आहेया पत्रात प्रशासना विरोधात काही गंभीर आरोप करण्यात आलेअसलेतरी या आरोपांची अधिकृत पुष्टी अद्याप झालेली नाही किंवा संबंधित प्रशासनाची बाजू समोर आलेली नाही.

दरम्याननांदेडचे काँग्रेस खासदार रवींद्र चव्हाण यांनी या संवेदनशील विषयाची दखल घेतली आहेआगामी लोकसभा अधिवेशनात ‘शून्यकाळात‘ हे मुद्दे उपस्थित करण्याचा तसेच तारांकित प्रश्नांच्या माध्यमातून सभागृहाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला जाईलअसे आश्वासन त्यांनी दिले असल्याची माहिती या पत्रात नमूद आहेतसेच शीख समाजाच्या भावना विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या पर्यंत प्रभावीपणे पोहोचवणार असल्याचेही खासदारांनी स्पष्ट केले आहे.

या पत्रात केवळ नांदेड पुरताच विषय मर्यादित  ठेवताउत्तराखंडमधील प्रसिद्ध श्री हेमकुंड साहिबयात्रेशी संबंधित काही घटनांचा दाखला देत शीख समाजाच्या सुरक्षेचा मुद्दाही अधोरेखित करण्यात आला आहेआगामी पंजाब विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर देशातील धार्मिक आणि राजकीय घडामोडींवरही या पत्रात महत्त्वपूर्ण भाष्य करण्यात आले असल्यानेया पत्राला राजकीय वर्तुळात विशेषमहत्त्व प्राप्त झाले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button