सामाजिक

संजीव डोईबळे यांना रोटरी फाउंडेशनचा मानाचा ‘पॉल हॅरिस फेलो’ (PHF) सन्मान

श्रमिक एकता न्यूज़ नेटवर्क मुखेड ०२ जुलै २६

रोटरी क्लब ऑफ मुखेड सिटीचे सदस्य रोटेरियन संजीव डोईबळे यांना रोटरी फाउंडेशनतर्फे ‘पॉल हॅरिस फेलो’हा प्रतिष्ठेचा सन्मान प्रदान करण्यात आला आहे. रोटरी वर्ष २०२५-२०२६ मधील ‘विशेष अधिक मास महोत्सवा’निमित्त त्यांनी दिलेल्या सामाजिक योगदाना बद्दल हा सन्मान जाहीर करण्यात आला.

समाजाप्रती असलेली आपली बांधिलकी जपत, रोटरीच्या ‘स्वतःच्या आधी सेवा’ या ध्येयाला बळकटी देण्यासाठी संजीव डोईबळे यांनी ३१,००० रुपयांची भरीव देणगी दिली आहे. संस्थेच्या माहितीनुसार, पवित्र अशा अधिक मासाच्या पर्वावर त्यांनी दिलेले हे आर्थिक योगदान मानवतावादी प्रकल्प आणि लोकांचे जीवनमान उंचावणाऱ्या विविध सेवा उपक्रमांसाठी वापरले जाणार आहे. यातून समाजात कायमस्वरूपी आणि सकारात्मक बदल घडण्यास मोठी मदत होणार आहे.

रोटरी डिस्ट्रिक्ट ३१३२ च्या ‘युनाईट फॉर गुड’ (Unite For Good) या संकल्पनेअंतर्गत त्यांच्या या कार्याची विशेष दखल घेण्यात आली आहे. त्यांच्या या दातृत्वाबद्दल डिस्ट्रिक्ट गव्हर्नर सुधीर लातुरे आणि डिस्ट्रिक्ट एपीएफ चेअर व टीआरएफ डायरेक्टर रोटेरियन हरीश नय्यर यांनी त्यांचे विशेष आभार मानले असून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

सामाजिक भान राखून समाजाच्या उन्नतीसाठी सढळ हाताने मदत केल्याबद्दल रोटेरियन संजीव डोईबळे यांचे मुखेड शहरात आणि रोटरी परिवारात सर्वत्र कौतुक होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button