शहर

मुखेड येथील भाजपचे एकनिष्ठ कार्यकर्ते शेख रजाक यांचे दुःखद निधन; आज सायंकाळी होणार अंत्यविधी

श्रमिक एकता न्यूज़ नेटवर्क मुखेड: ०१ जुलै २६

भारतीय जनता पक्षाचे अत्यंत एकनिष्ठ कार्यकर्ते आणि मुखेड येथील सुपरिचित व्यक्तिमत्त्व शेख रजाक उर्फ पाशा पटेल यांचे दुःखद निधन झाले आहेत्यांच्या निधनाने मुखेड परिसरातील भाजप कार्यकर्ते आणि व्यावसायिक वर्गात मोठी शोककळा पसरली आहे.

शेख रजाक हे गेल्या अनेक वर्षांपासून मुखेड पंचायत समिती परिसर येथे चहापाण्याचा व्यवसाय करत होतेआपल्या कष्टाळूमनमिळाऊ आणि प्रामाणिक स्वभावामुळे त्यांनी पंचायत समितीमध्ये येणाऱ्या नागरिकांशी आणि प्रशासकीय वर्गाशी जिव्हाळ्याचे संबंध निर्माण केले होतेपक्षाचे एकनिष्ठ कार्यकर्ते म्हणूनही त्यांनी नेहमीच सक्रिय योगदान दिले.

त्यांच्या पश्चात पत्नीआई मुली आणि  मुलगा असा मोठा परिवार आहेत्यांच्या अचानक जाण्याने संपूर्ण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

मरहूम शेख रजाक यांच्यावर आज (बुधवारबाद नमाजे मगरीब (सायंकाळच्या नमाजानंतरमुखेड येथील फॉरेस्ट ऑफिस कब्रस्तान (स्मशानभूमी) येथे अंत्यविधीची नमाज (नमाजजनाजाअदा केली जाणार असूनत्यानंतर तिथेच दफनविधी पार पडेल.

तमाम नागरिकांना आणि स्नेह्यांना या अंत्यविधीस उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहेअल्लाह मरहूम शेख रजाक साहब यांना जन्नत मध्ये उच्च स्थान देवो आणि त्यांच्या कुटुंबाला हे दुःखसहन करण्याची शक्ती देवोहीच श्रमिक एकता न्यूज़ परिवाराकडून  प्रार्थना.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button