मुखेड शहरात १९ जुलै रोजी मतदार याद्यांच्या पुनर्निरीक्षणासाठी ‘विशेष कॅम्प’

▫️शहरातील ७ प्रमुख ठिकाणी २९ बी.एल.ओ. राहणार उपस्थित; मतदारांनी लाभ घेण्याचे अनुप पाटील यांचे आवाहन
श्रमिक एकता न्यूज नेटवर्क मुखेड :- १७ जुलै २६
भारत निवडणूक आयोगाच्या वतीने मतदार याद्यांचा विशेष पुनर्निरीक्षण कार्यक्रम (Special Intensive Revision – २०२६) सुरू करण्यात आला आहे. या कार्यक्रमाच्या अनुषंगाने ९१ मुखेड विधानसभा मतदार संघातील मुखेड शहरात येत्या १९ जुलै २०२६ रोजी विशेष कॅम्पचे आयोजन करण्यात आले आहे. मतदारांच्या सोयीसाठी राजकीय पक्षांच्या BLA यांच्या बैठकीत सर्वानुमते हा निर्णय घेण्यात आला असून, देगलूरचे उपविभागीय अधिकारी तथा ९१ मुखेडचे मतदार नोंदणी अधिकारी मा. अनुप पाटील यांनी ही माहिती दिली आहे.
प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, मुखेड शहरातील निश्चित केलेल्या विविध ठिकाणी शहरातील एकूण २९ मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (B.L.O.) सकाळी ११:०० ते सायंकाळी ०५:०० या वेळेत उपस्थित राहणार आहेत. या विशेष कॅम्पमध्ये बी.एल.ओ. कडून मतदारांना ‘Enumeration Form’ चे वाटप केले जाईल आणि ते जागीच भरून घेतले जाणार आहेत.
शहरातील विविध यादी भागातील मतदारांसाठी एकूण ७ ठिकाणी हे विशेष कॅम्प आयोजित करण्यात आले आहेत:
१. जि.प. हायस्कूल (मुलांचे), मुखेड २. सावित्रीबाई फुले प्रा. शाळा, फुले नगर, मुखेड ३. कै. गोविंदराव राठोड सभागृह, क्रीडा संकुल परिसर, मुखेड ४. गुरुदेव विद्या मंदिर, शिवाजी नगर, मुखेड ५. दत्त मंदिर सभागृह, तेलीपेठ गल्ली, मुखेड ६. केंद्रीय प्रा. शाळा (ब्रँच), जुने पोलीस ठाणे, मुखेड ७. पेरेकेवार समाज मंदिर सभागृह, मुखेड
या सर्व विशेष कॅम्पच्या ठिकाणी संबंधित यादी भागांचे नियुक्त बी.एल.ओ. उपस्थित राहून कामकाज पाहतील. तरी मुखेड शहरातील सर्व मतदारांनी या सुविधेचा लाभ घ्यावा आणि निश्चित केलेल्या ठिकाणी उपस्थित राहून आपले ‘Enumeration Form‘ भरून द्यावेत, असे जाहीर आवाहन उपविभागीय अधिकारी मा. अनुप पाटील यांनी केले आहे.



