वांगचुक यांच्या समर्थनार्थ मुखेडमध्ये समविचारी राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटनांच्या बैठकीचे आयोजन

▫️सोनम वांगचुक मृत्यूशी झुंज देतायत, मात्र सरकार बघ्याच्या भूमिकेत!
▫️आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी महत्त्वपूर्ण बैठक
श्रमिक एकता न्यूज़ नेटवर्क मुखेड : १६ जुलै २६
नीट (NEET) परीक्षेतील अनियमिततेबद्दल केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासह परीक्षा पद्धतीत सुधारणा करण्याच्या मागणीसाठी सोनम वांगचुक गेल्या १९ दिवसांपासून अनिश्चित काळासाठी दिल्ली जंतर मंतर येथे उपोषणाला बसले आहेत. त्यांच्या या प्रामाणिक आंदोलनाकडे केंद्रसरकार सपशेल दुर्लक्ष करत असून, या असंवेदनशील सरकारच्या विरोधात आणि वांगचुक यांच्या समर्थनार्थ एकदिवसीय ‘धरणे आंदोलन‘ पुकारण्यात येणार आहे. या आंदोलनाच्या नियोजनासाठी उद्या दि १७ जुलै शुक्रवारी सायंकाळी ६ वाजता छत्रपती शिवाजी महाराज स्मारक येथे समविचारी सर्वपक्षीय विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.

गेल्या १९ दिवसांपासून सुरू असलेल्या या उपोषणामुळे वांगचुक यांचे वजन तब्बल ९ किलोने घटले असून ते ५७.१५ किलोवर आले आहे. त्यांचा थकलेला देह पाहून देशभरातून हळहळ व्यक्त होत आहे. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, ते पूर्णपणे शुद्धीवर असले तरी या प्रदीर्घ उपोषणाचा त्यांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत असून त्यांची प्रकृती चिंताजनक बनली आहे. देशातील शिक्षण व्यवस्थेचा उडालेला बोजवारा आणि करोडो विद्यार्थ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी ते मृत्यूशी झुंज देत आहेत, तरीही या ‘कठोरकाळजाच्या‘ सरकारला जाग येत नसल्याचे चित्र आहे.
केंद्रातील सरकारच्या या वेळकाढू आणि दुर्लक्षित धोरणाचा निषेध नोंदवण्यासाठी शहरात व्यापकस्तरावर एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनाची रूपरेषा आणि पुढील दिशाठरवण्यासाठी उद्या दि १७ जुलै शुक्रवार सायंकाळी ठीक ६:०० वाजता, छत्रपती शिवाजी महाराज स्मारक येथे सर्वपक्षीय नेते आणि विविध संघटनांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली आहे.
तरी शहरातील सर्व समविचारी राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी या बैठकीलाआवर्जून उपस्थित राहावे, असे आवाहन सर्व समविचारी पक्षीय व संघटनांच्या वतीने करण्यात आले आहे.



