सामाजिक

राष्ट्रीय अल्पसंख्याक परिषदेची जम्बो कार्यकारणी जाहीर.

श्रमिक एकता न्यूज़ नेटवर्क मुखेड:- १७ ऑगस्ट२६ 

 राष्ट्रीय अल्पसंख्याक परिषदेचे अध्यक्ष राहुल डंबाळे यांच्या मान्यतेनुसार मराठवाडा अध्यक्ष आब्दुल माजीद बशीर,नांदेड ग्रामीण जिल्हाध्यक्ष महेताब शेख यांनी राष्ट्रीय अल्पसंख्याक परिषद मराठवाडा,जिल्हानांदेड शहर  मुखेड तालुका कार्यकारणी मध्ये नव्याने पदाधिकायांच्या निवडी जाहीर करुन त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले आहे.निवडिबद्दल सर्व नवनिर्वाचित पदाधिकारीकार्यकारणी सदस्यांचे अभिनंदन होत आहे.

    राष्ट्रीय अल्पसंख्याक परिषद आयोजित समिक्षा बैठक  कार्यकारणी निवड कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी  जेष्ठ पत्रकार संपादक अलताफ सानी हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून  मराठवाडा अध्यक्ष आब्दुल माजीद बशीर, जिल्हाध्यक्ष महेताब शेख,प्रा.जुबेर खानडॉ.हाकीम खान,शेखर पोपुलवार,मिर्झा नबाब बेग,अॅड जफर शेख,निहाल मन्सुरी लोहेकर,मुखेड तालुकाध्यक्ष असद बल्खी यांची प्रमुख उपस्थिती होती.

    राष्ट्रीय अल्पसंख्याक परिषद या सामाजिक संघटनेत नव्याने निवड झालेले नुतन पदाधिकारी पुढील प्रमाणे मराठवाडा सरचिटणीस पदी गौसअल्ली सलगरकरमराठवाडा उपाध्यक्षपदी अॅड अस्लम शेख,मराठवाडा संघटक पदी जैनोदीन पटेल यांची मराठवाडा कार्यकारणीत निवड झाली आहे त्याच बरोबर युवा जिल्हाध्यक्षपदी जलील पठाण,जिल्हा सरचिटणीस पदी हसनोद्दीन शेख उर्फ बबलू मुल्ला मुखेड,जिल्हा उपाध्यक्ष चाँदपाशा शेख हदगाव, जिल्हा सहसचिव दाऊत शेख अहेमदपुरकरजिल्हा संघटक अन्सार पठाण लोहा,जिल्हा कोषाध्यक्ष पत्रकार जाफर सय्यद नायगाव,जिल्हा सहसंघटक मन्नुभाई शेख बामणीकर यांना जिल्हा कार्यकारणीत काम करण्याची संधी मिळाली आहे.

तसेच नांदेड शहराध्यक्ष पदी मोहमद अझहर,महिला आघाडी शहराध्यक्षपदी फरहाना बेगम,युवा शहराध्यक्षपदी मुश्ताक सय्यद, शहर सचिव  मोहम्मद फारुक शहर सह सचिव साजिद हुसेन,शहर कार्याध्यक्ष अॅड जफर शेख,उपाध्यक्ष आदील इनामदार,शहर संघटक सज्जाद अहेमद यांची निवड करण्यात आली आहे.तसेच मुखेड तालुका समन्वयकपदी मोतीपाशा पाळेकर,तालुका उपाध्यक्षपदी चाँदसाब येवतीकर,तालुका कार्यध्यक्ष जयभिम सोनकांबळे,युवा तालुकाध्यक्ष इमरान अत्तार,युवा तालुका सचिव शफी खुरेशी, तालुका कोष्याध्यक्ष रसूल शेख जांभळीकर,तालुका संघटक फारुक पटेल धामणगावकर,तालुका सल्लागार रजाक शेख एकलारकर,तालुका प्रसिद्धिप्रमुख मुजीब सय्यद जांब,सह कोष्याध्यक्ष खाजा भाई सलगरकर,

मुखेड शहराध्यक्षपदी गौस मिर्झा,शहरसचिव शबीर बल्खी,शहर कार्याध्यक्ष अॅड मिलिंद काबंळे,शहर उपाध्यक्ष खदिर शेख,शहर संघटक इलियास कादरी ,कोषाद्यक्ष अमजत शेख यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.

मराठवाडाजिल्हा,नांदेड शहर,मुखेड तालुका,शहर कार्यकारणीत निवड झालेल्या सर्व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते नियुक्तीपत्र देवून पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.

कार्यक्रमाचे सुत्रसंचलन असद बल्खी यांनी केले.प्रस्ताविक आब्दुल माजीद बशीर यांनी केले तर उपस्थितांचे आभार महेताब शेख यांनी मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button