क्राईम

‘हिट अँड रन’: भरधाव कारच्या धडकेत ३१ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू

श्रमिक एकता न्यूज़ मुखेड/बाराहाळी : १७ ऑगस्ट २६

पायी चालणाऱ्या एका ३१ वर्षीय तरुणाला भरधाव कारने पाठीमागून जोराची धडक दिल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना बाराहाळीवडगाव राष्ट्रीय महामार्गावर शनिवारी सायंकाळी वाजेच्या सुमारास घडलीया ‘हिट अँड रन‘ प्रकरणी बेफिकीरीने कार चालवणाऱ्या एका शिक्षकावर मुक्रमाबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहेफयाज जावेदसाब शेख (वय ३१राबाराहाळीअसे मयत तरुणाचे नाव असून ते मुंबईत पोस्टमास्तर म्हणून कार्यरत होते.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसारमूळचे बाराहाळी (तामुखेडयेथील रहिवासी असलेले फयाज शेख हे मुंबई येथे पोस्टमास्तर या पदावर कार्यरत होतेकाही दिवसांपूर्वीच ते कामा निमित्त आपल्या गावी आले होतेशनिवारी सायंकाळी  वाजेच्या सुमारास ते नेहमीप्रमाणे फेरफटका मारण्यासाठी बाराहाळीते वडगाव राष्ट्रीय महामार्गावरून पायी जात होते.

ते ‘योगायोग बार अँड रेस्टॉरंट‘ जवळ आले असतावडगावहून बाराहाळीकडे भरधाव वेगाने येणाऱ्या एका मारुती सुझुकी अल्टो कारने (क्रएम.एच२६ – बी.एक्स७११६त्यांना पाठीमागून जोराची धडक दिलीया अपघाताची तीव्रता इतकी भयंकर होती कीफयाज शेख यांच्या डोक्याला गंभीर मार लागला आणि त्यातच त्यांचा जागीच मृत्यू झाला.अपघाताची माहिती मिळताच मुक्रमाबाद पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक (सपोनिराजू चव्हाण यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केलायाप्रकरणी मयताची पत्नी सिमरन फयाज शेख (वय २४यांनी मुक्रमाबाद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

त्यांच्या फिर्यादीवरूननिष्काळजीपणाने  हयगयीने कार चालवून मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी कारचालक तथा आरोपी शिक्षक संदीप माधवराव रावणगावकर याच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहेभारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ च्या कलम १०६ (आणि २८१ अन्वये (गुन्हा रजिस्टर नं१२०/२०२६हा गुन्हा दाखल करण्यात आला असूनया प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक ताहेर शेख हे करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button