उद्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांची बाऱ्हाळी येथे जाहीर सभा

शेषेराव चव्हाणांसह अनेकांचा पक्षप्रवेश
इतरांना आपल्या पक्षात ओढण्याचा चिखलीकर यांचा धडका सुरू
मुखेड प्रतिनिधी:-
विधानसभा निवडणुकीनंतर नांदेडमध्ये महायुतीतील भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार गटात पक्ष प्रवेशाची चढाओढ लागली आहे
विशेष म्हणजे ही चढाओढ भाजप खासदार तथा माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि राष्ट्रवादीचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्यात होत आहे
उद्या दि ११ मे रोजी मुखेड तालुक्यातील बाऱ्हाळी येथे आयोजित जाहीर सभेत शिवशंकर जय साखरकारखान्याचे माजी अध्यक्ष शेषेराव चव्हाण आणि त्यांच्या अनेक सहकाऱ्यांचा राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश होणार आहे. ही माहिती आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. त्यांनी सांगितले की, नांदेड जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बळकटीसाठी मोठा संकल्प हाती घेतला आहे आणि आतापर्यंत ९०हजार सदस्यांची नोंद झाली असून हा आकडा लवकरच लाखाच्या पुढे जाईल, असा विश्वास त्यांनीव्यक्त केला. या जाहीर सभेला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, ना. इंद्रनील नाईक, रूपाली ताई चाकणकर यांच्यासह विविध स्तरांतील नेते आणि पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. शेषेराव चव्हाण यांच्यासोबत बाबुराव पवित्रे, अण्णासाहेब जहिरे, दिलीप कोटगिरे यांचाही पक्षप्रवेशहोणार आहे. या कार्यक्रमामुळे नांदेड जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजकीय शक्तीला नवे बळ मिळेल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. या पत्रकार परिषदेस माजी आमदार मोहन हंबर्डे, अविनाश घाटे, जिल्हाध्यक्ष दिलीपराव धर्माधिकारी, व्यंकटराव पाटील गोजे– गावकर, प्रा. उदय चव्हाण, मुक्तेश्वर धोंडगे, शिवराज पाटील होटाळकर, पठाण, वैशाली चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती.



