क्राईम

नांदेड जिल्ह्यात पत्रकार संरक्षण कायद्यांतर्गत पहिला गुन्हा दाखल; बातमी छापल्याच्या रागातून पत्रकाराचे अपहरण करण्याचा प्रयत्न, पाच जण अटकेत

अर्धापूर (प्रतिनिधी): श्रमिक एकता न्यूज़ २८ मार्च २६

सत्य बातमी प्रसिद्ध केल्याच्या रागातून एका पत्रकाराला धक्काबुक्की करूनत्यांचे अपहरण करण्याचा प्रयत्न करत जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या पाच जणांच्या मुसक्या अर्धापूर पोलिसांनी आवळल्या आहेतनांदेड जिल्ह्यातील पत्रकार संरक्षण कायद्यांतर्गत दाखल झालेला हा पहिलाच गुन्हा असल्याचे समजते.

नेमकी घटना काय?

आंबेगाव (ताअर्धापूरयेथील रहिवासी आणि ‘दैनिक श्रमिक लोकराज्यचे प्रतिनिधी रामचंद्र ऊर्फ मनोज माणिकराव मनपुर्वे यांनी २५ मार्च २०२६ रोजी एक धाडसी बातमी प्रसिद्ध केली होतीलहानगावात भोंगाडीजे बंदीचा निर्णयपण अवैध दारूवर गावकऱ्यांचा रोष कायम अशा मथळ्याखाली हीबातमी प्रसिद्ध झाली होतीया बातमीमुळे अवैध धंदेवाल्यांचे धाबे दणाणले होते.

दिनांक २६ मार्च रोजी रात्री :३० वाजेच्या सुमारासमनोज मनपुर्वे हे जेवण करून घराबाहेर पडले असतागावातील अनिल सावंत यांनी त्यांना भेटायला बोलावलेते दोघे पोलीस पाटील यांच्या पानपट्टी जवळ बोलत असताना अचानक दोन मोटारसायकल वरून संतोष बोले आणि त्याचे इतर साथीदार तिथे आले.

आमच्या गावाची बातमी छापण्याचा तुला अधिकार काय?” असे म्हणत आरोपींनी मनपुर्वे यांना शिवीगाळ करत धक्काबुक्की सुरू केलीआरोपींनी त्यांना जबरदस्तीने मोटारसायकलवर बसवून पळवून नेण्याचा (अपहरणप्रयत्न केलायावेळी मनपुर्वे यांनी प्रतिकार केला असतात्यांचा मोबाईल हिसकावून घेण्यात आला आणि त्यांना पुन्हा गाडीवर बसवून ‘लहान‘ गावाकडे नेण्याचा प्रयत्न झाला.

मनपुर्वे यांचा आरडा ओरडा ऐकून त्यांची पत्नीआईवडीलभाऊ आणि गावकरी धावून आलेगर्दी जमा झाल्याचे पाहून आरोपींनी “पुन्हा गावात दिसला तर जिवंत सोडणार नाही” अशी धमकी देत तिथून पळकाढला.

याप्रकरणी मनोज मनपुर्वे यांनी अर्धापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिलीघटनेचे गांभीर्य ओळखून वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रशेखर कदमयांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तत्काळ कारवाई करत संतोषबोलेसह पाचही आरोपींना अटक केली आहे.

अर्धापूर पोलिसांनी आरोपींविरुद्ध बीएनएस (BNS) कलम १३७ (), ६२११५ (), ३५१ (), ३५१ (आणि १८९ (सह पत्रकार संरक्षण कायदा कलम ४ अन्वये गुन्हा दाखल केला आहेया प्रकरणाचा पुढील तपास पीएसआय भोसले करत आहेत.

पत्रकारावरील या हल्ल्याचा जिल्ह्यातील पत्रकार संघटनांनी तीव्र निषेध केला असूनगुन्हेगारांवर कठोरकारवाई करण्याची मागणी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button