सामाजिक

मुखेड येथे मुख्य कार्यकारी अधिकारीच्या समक्ष जनतेच्या तक्रारींचा निपटारा

मुखेड प्रतिनिधी:- 

मुखेड पंचायत समिती येथे  जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांच्याउपस्थितीत मंगळवारी तक्रार निवारण दिनाचे आयोजन करण्यात आले होतेया तक्रार निवारण दिनाच्यानागरिकांच्या समस्यांवर चर्चा करुन त्याचे निवारण करण्यात आले.

यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्पसंचालक डॉसंजय तुबाकले यांच्यासह जिल्हा परिषदेचे सर्व खाते प्रमुख उपस्थित होते.

मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी नागरिकांच्या व्यक्तिगत तक्रारी ऐकून त्यांच्यावर तत्काळउपाययोजना करण्याचे आदेश दिलेतक्रार निवारण दिनाच्या आयोजनामुळे नागरिकांना त्यांच्यासमस्यांबाबत त्वरित उत्तर मिळाली.

तक्रार निवारण उपक्रमामुळे प्रशासन  नागरिकांमध्ये सुसंवादाची भावना निर्माण झालीतसेच समस्यांचेत्वरित निराकरण करण्यात आलेयावेळी नागरिकांनी दिलेले निवेदन जिल्हा स्तरावर संबंधीत विभागप्रमुखांना वर्ग करण्यात आले असून त्या तक्रारीचे लवकरच निवारण करण्यात येणार आहे.

तक्रारींचा आढावा घेण्यासाठी सामान्य प्रशासन विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी राजकुमारमुक्कावारमुख्य लेखा  वित्त अधिकारी शिवप्रकाश चन्नाजलजिवन मिशचे प्रकल्प संचालक तथा उपमुख्य कार्यकारी नारायण मिसाळजिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉप्रवीण घुलेसमाजकल्याण अधिकारीसत्येंद्र आऊलवारशिक्षणाधिकारी डॉसविता बिरगेजिल्हा आरोग्य अधिकारी डॉसंगीता देशमुखमहिला  बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी थोरातकार्यकारी अभियंता भोजराजमुख्य कार्यकारी अधिकारी यांचे स्वीय सहाय्यक शुभम तेलेवार तसेच विविध विभागाचे खाते प्रमुखगटविकास अधिकारी सीएलरामोड आदींची उपस्थिती होती

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button