नऊ उमेदवारांचे अकरा नामनिर्देशन पत्र दाखल
आज अर्ज दाखल करण्याचे शेवटची मुद्दत
मुखेड : प्रतिनिधी
विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीसाठी दि.२८ रोजी सोमवारी नऊ उमेदवारांचे ११ नामनिर्देशन पत्रप्राप्त झाल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी अनुप पाटील यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.
मुखेड विधानसभा मतदारसंघासाठी नामनिर्देशन पत्र भरणा करण्याच्या पाचव्या दिवशी तेरा जणांना २२नामनिर्दे शन पत्र विक्री करण्यात आले आहेत. आज तारखेपर्यंत एकूण १२६ नाम निर्देशन पत्र विक्रीकरण्यात आले आहेत.
आज दि.२९ रोजी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचे शेवटची मुद्दत असून ४ नोव्हेंबर पर्यंत उमेदवारी अर्ज मागेघेता येणार आहेत. दि. २८ रोजी नऊ उमेदवारांचे ११ नामनिर्देशन पत्र प्राप्त झाले आहेत. यामध्ये यादव बळीराम कांबळे, गोविंददादाराव डुमणे, सचिन गोवर्धन चव्हाण, श्रीहरी राजाराम बुगडेमवार, प्रदीप धर्माजी इंगोले, बालाजी नामदेवखतगावकर, तुषार गोविंदराव राठोड, रुक्मीनबाई शंकर गीते, परशुराम दत्ता कदम यांचा समावेश असल्याचेनिवडणूक निर्णय अधिकारी अनुप पाटील प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळवले



