शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न निकाली काढणार-राजकुमार मुक्कावार

उप मुख्य कार्यकारी मुक्कावार यांनी दिले शिक्षक परिषदेच्या शिष्टमंडळास आश्वासन.
नांदेड प्रतिनिधी:- १२ जुलै २५
जिल्हा परिषदेअंतर्गत शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडवण्या संदर्भात महाराष्ट्र राज्य शिक्षकपरिषदेचे शिष्टमंडळ शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्न विज्ञान विषय शिक्षकांना वेतनश्रेणी लागू करणे.
शिक्षण विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख,पदोन्नत मुख्याध्यापक यांची पदे श पदोन्नती भरावी प्राथमिकशिक्षक,प्राथमिक पदवीधर,पदोन्नत मुख्याध्यापक यांना सलग बारा वर्षानंतर मिळणारी चट्टोपाध्यायवेतनश्रेणी व 24 वर्षानंतर मिळणारी वरिष्ठ वेतन श्रेणी लागू करावी.
डीसीपीएस धारक शिक्षकांची कपातीची रक्कम एनपीएस खाती संबंधित त्याच्या खात्यावर जमाकरावी.
जिल्हा बदलीने व जिह्यातील शिक्षकांचे भविष्य निर्वाह निधी खाते विवरण पत्रातील त्रुटी दुरुस्त करावे.जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार पाच सप्टेंबर “शिक्षक दिना“पूर्वी घोषित करून आदर्श शिक्षकांना पाचसप्टेंबर रोजी सन्मानित करण्यात यावे.जिल्ह्यातील वैद्यकीय रजेची देयके व सेवानिवृत्त शिक्षकांचीथकित देयके यासाठी निधी उपलब्ध करून देऊन प्रलंबित देयके अदा करवीत.शालेय पोषण आहारयोजना त्रयस्थ यंत्रणेमार्फत रावावेत व शिक्षकांना दररोज लागणारी अशैक्षणिक कामे देण्यात येऊ नये. ती कामे कमी करावीत. या मागण्याचे निवेदन देऊन सर्व प्रलंबित प्रश्ननांवर चर्चा करण्यात आली.

या प्रसंगी शिष्टमंडळास त्यांनी प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडवण्यासाठी योग्य ती कारवाई करूनप्रलंबित प्रश्न सोडवू आश्वासन दिले.
तसेच वेतन सातव्या वेतन आयोगातील त्रुटी संदर्भात प्राथमिक पदवीधर व सर्व विभागातील त्रुटी संदर्भातविभाग प्रमुखांना आदेशित केल्याची माहिती दिली.

याप्रसंगी शिष्टमंडळात शिक्षक परिषदेचे राज्य संघटन मंत्री सुरेश दंडवते, विभागीय अध्यक्ष संजयकोठाळे, जिल्हा नेते दिगंबर पाटील कुरे, जिल्हाध्यक्ष व्यंकट गंदपवाड, जिल्हा कार्यवाह प्रल्हाद राठोड, जिल्हा वरिष्ठ कार्याध्यक्ष बालाजी पांपटवार, जिल्हा प्रवक्ते रवि ढगे, जिल्हा कार्यालयीन मंत्री बळवंतमंगनाळे, जिल्हा संघटन मंत्री संजय मोरे,जिल्हा वरिष्ठ उपाध्यक्ष संजय वाकोडे,जिल्हा उपाध्यक्ष संभाजीपावडे, जिल्हा सल्लागार विजयकुमार गबाळे, जिल्हा संघटक हणमंत काऊलवार, जिल्हा संघटक संजिवमानकरी, नांदेड तालुका अध्यक्ष भगवान बकवाड, तालुका सरचिटणीस गणेश गजलवार, मुखेड तालुकापदाधिकारी नारायण गोडाजी, भोकर तालुका पदाधिकारी राजेश्वर चक्रावार आदिजण उपस्थित होते.



