Uncategorized

नर्सेसच्या प्रलंबित मागण्यांबाबत आरोग्यमंत्र्यांना निवेदन; महाराष्ट्र नर्सेस असोसिएशनची महत्त्वपूर्ण चर्चा

श्रमिक एकता न्यूज नेटवर्क:- ०२ नोव्हेंबर २६

नांदेड: राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर हे नांदेड येथे उपजिल्हा रुग्णालयाच्या उद्घाटनकार्यक्रमासाठी आले असता, महाराष्ट्र नर्सेस असोसिएशनचे संस्थापक आदीभाऊ बनसोडे यांनी त्यांचीप्रत्यक्ष भेट घेऊन राज्यातील नर्सेसच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर सविस्तर चर्चा केली आणि त्यांनामागण्यांचे निवेदन सुपूर्द केले.

या निवेदनात प्रामुख्याने राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) अंतर्गत कार्यरत नर्सेसचे सेवा समायोजन वकायमस्वरूपी नियुक्ती, तसेच आरोग्य सेवा संचालनालयातील (DHS) नर्सेसच्या परिविक्षाधीनकालावधीबाबतचे (Probation Period) महत्त्वाचे मुद्दे मांडण्यात आले. राज्यातील शासकीय, कंत्राटीव खाजगी अशा सर्वच क्षेत्रांत काम करणाऱ्या प्रत्येक परिचारिकेला न्याय मिळावा, त्यांच्या हक्कांचेसंरक्षण व्हावे आणि शासनाने नर्सिंग क्षेत्रातील प्रलंबित प्रश्नांना प्राधान्याने सोडवावे, अशी ठाम भूमिकासंघटनेने यावेळी मांडली.

नर्सेसच्या हक्कांसाठी, त्यांच्या सन्मानासाठी आणि न्यायासाठी महाराष्ट्र नर्सेस असोसिएशनचा हा लढायापुढेही अविरतपणे सुरूच राहील,असा निर्धारही संघटनेच्या वतीने व्यक्त करण्यात आला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button