Uncategorized

मुखेड बाजार समितीत मोठा राजकीय भूकंप: सभापती बाळाजी पाटील यांच्यावर अविश्वास ठराव दाखल, १७ संचालकांचे बंड!

श्रमिक एकता न्यूज नेटवर्क मुखेड:- ०५ नोव्हेंबर २६

मुखेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या राजकारणात मंगळवारी मोठी खळबळ उडाली आहे. बाजार समितीचे विद्यमान सभापती बालाजी पाटील अंबुलगेकर यांच्या मनमानी आणि अकार्यक्षम कारभाराला कंटाळून तब्बल १७ संचालकांनी त्यांच्या विरोधात दंड थोपटले आहेत. या सर्व संचालकांनी आक्रमक भूमिका घेत मंगळवारी जिल्हाधिकाऱ्यांची प्रत्यक्ष भेट घेतली आणि सभापतीं विरोधात सहीचे पत्र देऊन अधिकृतरीत्या अविश्वास प्रस्ताव दाखल केला आहे. १७ संचालक एकाच वेळी विरोधात गेल्याने सभापतींची खुर्ची आता धोक्यात आली असून त्यांना आपले पद गमवावे लागण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.

दोन वर्षांच्या कारभारावर संचालकांचा तीव्र रोष दोन वर्षांपूर्वी सभापतीपदी विराजमान झालेल्या अंबुलगेकर यांच्या कार्यपद्धतीवर संचालक मंडळाने अत्यंत तीव्र आक्षेप नोंदवले आहेत. गेल्या काही महिन्यांपासून संचालकांमध्ये असलेली खदखद आता अविश्वास ठरावाच्या रूपाने समोर आली आहे.

संचालकांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनानुसार सभापतींवरील गंभीर आरोप खालील प्रमाणे.

बाजार समितीच्या दैनंदिन कामकाजावर आणि प्रशासनावर सभापतींचे कोणतेही नियंत्रण व समन्वयउरलेला नाही.
 शेतकरी आणि व्यापारी वर्ग यांच्यात योग्य ताळमेळ राखला जात नसल्याने, शेतमाल विक्रीसाठी आणणाऱ्या शेतकऱ्यांना योग्य न्याय मिळत नाही.
सभापतींच्या मनमानी कारभारामुळे बाजार समितीच्या उत्पन्नावर विपरीत परिणाम झाला आहे.
 कायद्यानुसार जबाबदाऱ्या पार पाडण्यात सभापती कुचराई करत असल्याने बाजार समितीच्या लौकिकाला मोठी बाधा पोहोचत आहे.
 वेळोवेळी तोंडी व लेखी सूचना देऊनही सभापतींनी त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे.
सभेच्या विषय पत्रिकेनुसार सभा बोलावली जात नाही तसेच सभेतील चर्चेनुसार इतिवृत्त (प्रोसिडिंग) लिहिले जात नाही.
शासनाकडून येणाऱ्या पत्रव्यवहारा बाबतही इतर संचालकांना जाणीवपूर्वक अंधारात ठेवले जाते.
या १७ संचालकांच्या आहेत स्वाक्षऱ्या शासन, समिती, शेतकरी आणि बाजार घटकांच्या हिताकडे दुर्लक्षहोत असल्याने संपूर्ण संचालक मंडळाचा सभापतींवरून आता अजिबात विश्वास राहिलेला नाही. दाखलकरण्यात आलेल्या अविश्वास ठरावाच्या पत्रावर खालील १७ संचालकांच्या स्वाक्षऱ्या आहेत: दत्तात्रयपाटील, जीवनराव नाईक, वीरभद्र हिमगिरे, पांडुरंग महाजन, संजयसिंह देवकते, व्यंकटराव गुंडेराव गुबरे, नारायण सादगीर, नागनाथ जाधव, नागनाथ गायकवाड, व्यंकटराव भोसले, शकुंतला कोंडेलवाड, नंदकुमार सातापुरे, शिवाजी बोडके, सुनिता नरोटे, विठ्ठलराव पाटील, आणि व्यंकट लोहबंडे.

हा अविश्वास प्रस्ताव मंजूर करण्यासाठी ‘महाराष्ट्र कृषी उत्पन्न खरेदी-विक्री अधिनियमा’खाली विशेष सभा बोलावण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे. या विशेष सभेत सभापतींविरोधातील हा अविश्वास प्रस्ताव संचालक दत्तात्रय पाटील हे मांडणार आहेत. १७ संचालक एकत्र येऊन उचललेल्या या पावलामुळे मुखेड तालुक्याच्या राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली असून पुढील घडामोडींकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button