Uncategorizedराजकीय

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा रविवारी नांदेड दौरा; १०० खाटांच्या रुग्णालयासह अनेक मोठ्या विकासकामांचे होणार लोकार्पण!

श्रमिक एकता न्यूज़ नेटवर्क नांदेड: ३१ ऑक्टोंबर २६ 

नांदेडवासीयांसाठी एक मोठी आणि महत्त्वाची बातमी आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेरविवार, १ नोव्हेंबर २०२६ रोजी नांदेड जिल्ह्याच्या झंझावाती दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात नांदेड उत्तरमतदारसंघातील बहुप्रतिक्षित अशा १०० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयाच्या नव्या इमारतीचे लोकार्पणत्यांच्या हस्ते पार पडणार आहे. यासोबतच दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी आणि सामान्य नागरिकांसाठीअनेक महत्त्वपूर्ण योजनांचा शुभारंभही ते करणार आहेत.

उपमुख्यमंत्री कार्यालयाकडून ३० ऑक्टोबर २०२६ रोजी जारी करण्यात आलेल्या अधिकृत दौऱ्यानुसार, उपमुख्यमंत्र्यांचे सविस्तर वेळापत्रक खालीलप्रमाणे आहे:

रविवारी दुपारी १२:३० वाजता उपमुख्यमंत्री ठाणे येथील निवासस्थानाहून मोटारीने मुंबई विमानतळाकडेरवाना होतील.

दुपारी १:०० वाजता मुंबई विमानतळावरून विशेष विमानाने ते नांदेडकडे प्रस्थान करतील आणि दुपारी१:४५ वाजता नांदेड विमानतळावर त्यांचे आगमन होईल.

विमानतळावरून ते थेट मोटारीने वाडी (बु.), नांदेडकडे रवाना होतील.

(दुपारी २:०० वाजता): वाडी (बु.), नांदेड येथील उपजिल्हा रुग्णालयाच्या ठिकाणी आमदार श्री. बालाजी कल्याणकर यांच्या संदर्भाने मुख्य लोकार्पण व उद्घाटन सोहळा आयोजित करण्यात आलाआहे. दुपारी २:०० वाजता होणाऱ्या या भव्य सोहळ्यात खालील प्रमुख विकासकामांचे लोकार्पण वशुभारंभ होईल:

नवनिर्मित १०० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालय मुख्य इमारतीचा भव्य लोकार्पण सोहळा.

दळणवळण सुलभ व्हावे यासाठी नांदेड जिल्ह्यातील विविध रस्त्यांचे लोकार्पण.

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या जनावरांसाठी चारा वाटप कार्यक्रमाची सुरुवात.

दुष्काळग्रस्तांना तत्काळ दिलासा देण्यासाठी टँकरद्वारे पाणी वाटपाचा शुभारंभ.

समाजातील गरजू महिलांना रोजगारासाठी शिलाई मशीन वाटप आणि शालेय विद्यार्थीनींसाठी सायकलवाटप कार्यक्रम.

हा भरगच्च आणि महत्त्वपूर्ण कार्यक्रम आटोपल्यानंतर सायंकाळी ४:०० वाजता उपमुख्यमंत्री मोटारीनेपुन्हा नांदेड विमानतळाकडे रवाना होतील. सायंकाळी ४:१५ वाजता विमानाने ते मुंबईकडे प्रस्थानकरतील. सायंकाळी ४:४५ वाजता मुंबई विमानतळावर आगमन झाल्यानंतर ते मोटारीने मुंबई/ठाणेनिवासस्थानाकडे रवाना होतील आणि सायंकाळी ५:१५ वाजता पोहोचतील.

नांदेडमध्ये होणाऱ्या या विकासकामांच्या उद्घाटनामुळे आणि दुष्काळग्रस्त भागासाठी सुरू होणाऱ्याउपाययोजनांमुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळणार असून, संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष या महत्त्वाच्यादौऱ्याकडे लागले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button