संपादकीय

जिद्द, मेहनत आणि प्रामाणिकपणाचा संगम: ‘दै. श्रमिक लोकराज्य’चे आधारस्तंभ ज्ञानेश्वर डोईजड!

“कर्तृत्ववान माणसाला वारशाची गरज नसते, त्याचे कार्यच त्याची ओळख निर्माण करते.” या ओळी आपल्या मुखेड तालुक्यातील एक धडाडीचे व्यक्तिमत्वदै. श्रमिक लोकराज्यचे संपादक आणि माझे स्नेही सहकारी मित्र ज्ञानेश्वर डोईजड यांना तंतोतंत लागू पडतातआज त्यांचा वाढदिवसत्यानिमित्ताने त्यांच्या संघर्षाचा आणि यशाचा घेतलेला हा एक छोटासा आढावा.

आजच्या काळात एखादे दैनिक वर्तमानपत्र चालवणे ही साधी गोष्ट नाहीकोणताही मोठा राजकीयवारसा पाठीशी नसताना आणि कोणतेही मोठे आर्थिक पाठबळ नसतानाज्ञानेश्वरजींनी केवळ स्वतःचीमेहनत, जिद्द आणि प्रामाणिकपणाच्या जोरावर ‘दैश्रमिक लोकराज्य‘ हे नाव घराघरात पोहोचवले आहेवाचकांचे प्रेमजाहिरातदारांचा विश्वास आणि मित्रपरिवाराची साथ या त्रिसूत्रीच्या जोरावर त्यांनी आपल्या वृत्तपत्राची प्रगती पथावर ठेवली आहे.

ज्ञानेश्वर केवळ पत्रकारितेपुरते मर्यादित नाहीततर समाजाच्या विविध प्रश्नांवर ते हिरीरीने काम करतात.

अखिल भारतीय मराठी पत्रकार संघमुखेडचे तालुका अध्यक्ष आणि ‘दैश्रमिक लोकराज्यचे संपादक म्हणून काम करताना त्यांनी नेहमीच सामान्य जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडली आहेवाचकांचा विश्वास आणि जाहिरातदारांचे सहकार्य हीच त्यांची खरी संपत्ती आहेप्रतिकूल परिस्थितीतही डगमगून  जातापत्रकारितेची मूल्ये जपत त्यांनी दैनिकाचे काम आज प्रगतीपथावर नेले आहे.

केवळ पत्रकारिताच नव्हेतर सामाजिक बांधिलकी म्हणून ‘लातूर रोडमुखेडबिलोलीबोधन रेल्वे संघर्षसमितीचे सचिव म्हणूनही ते महत्त्वाची जबाबदारी पार पाडत आहेतया भागातील रेल्वे प्रश्नासाठी त्यांनी दिलेला लढा आणि त्यांचे नियोजनबद्ध कार्य हे त्यांच्या ध्येयवादी व्यक्तिमत्त्वाचा परिचय करून देतेरेल्वेचे हे स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी ते अहोरात्र कष्ट घेत आहेत.

माझे सहकारी मित्र म्हणून ज्ञानेश्वरजींचे व्यक्तिमत्व नेहमीच प्रेरणादायी राहिले आहेसमोर कितीही अडचणी आल्या तरी डगमगून  जाताहसतमुखाने संकटांचा सामना कसा करावाहे त्यांच्याकडूनशिकावेत्यांच्या कामाची पद्धत आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्याची त्यांची वृत्ती त्यांना इतरांपेक्षा वेगळे ठरवते.

एक संपादक आणि एक नेता म्हणून वावरतानाहीज्ञानेश्वर डोईजड यांनी आपल्यातील ‘मित्र‘ कधीही हरवू दिला नाहीमित्र परिवारासाठी ते नेहमीच खंबीरपणे उभे राहणारे एक विश्वासू सहकारी आहेत

कष्टाने मिळवलेली ही माणसांची जोडणीच त्यांना इतर कोणापेक्षाही श्रीमंत बनवतेत्यांच्या सहवासात मिळणारी ऊर्जा ही त्यांच्यातील निखळ मैत्रीची साक्ष देते.

आज ज्ञानेश्वर डोईजड यांचा वाढदिवसकेवळ जिद्दमेहनत आणि प्रामाणिकपणाच्या जोरावर यशाची शिखरे सर करणाऱ्या माझ्या या लाडक्या सहकाऱ्याला उदंड आयुष्य लाभोहीच ईश्वरचरणी प्रार्थनायेणाऱ्या काळात ‘दैश्रमिक लोकराज्यचा हा प्रवास असाच उत्तरोत्तर प्रगती करत राहो आणि सामाजिक कार्यात त्यांचे योगदान नेहमीच अतुलनीय ठरोवाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!

शुभेच्छुक:

भाई आसद इब्राहिम बल्खी

संपादकश्रमिक एकता न्यूज

तथा उपाध्यक्षरेल्वे संघर्ष समिती

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button