Uncategorized

राजे छत्रपती अकॅडमीच्या वतीने पाळा येथील गुणवंताचा सत्कार.

मुखेड / प्रतिनिधी

  मुखेड शहरापासुन जवळच असलेल्या बेरळी फाटा येथील राजे छत्रपती सैन्य व पोलिस भरतीपुर्व प्रशिक्षण केंद्राच्या वतीने सैनिक फेडरेशनचे नांदेड जिल्हाध्यक्ष तथा राजे छत्रपती अकॅडमीचे  संचालक ज्ञानेश्वर पाटील डुमणे पाळेकर यांनी आपली मातृभूमी पाळा येथील विविध क्षेत्रात उल्लेखनीय यश मिळविलेल्या तसेच सामाजिक कार्यात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या सर्व गुणवंताचा कार्यक्रमाचे अध्यक्ष पोलिस निरिक्षक रमेश वाघ, उदघाटक आरपीआयचे जिल्हाध्यक्ष गौतम काळे व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र, शाल व पुष्पहार देवून यथोचित सत्कार करण्यात आला. विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या युवक व युवतींचा गौरव सोहळा माजी सैनिक  ज्ञानेश्वर पाटील डुमणे यांच्या संकल्पनेतून गेल्या काही वर्षांपासून पार पडत आहे.
   कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुखेड पोलिस स्टेशनचे पोलिस निरिक्षक रमेश वाघ हे होते तर उदघाटक म्हणुन रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाचे नांदेड जिल्हाध्यक्ष गौतम काळे, प्रमुख आतिथी म्हणुन पोलीस हवालदार पांडुरंग पाळेकर,पोलिस हवालदार जायेभाये,आखरग्याचे सरपंच संदीप काळे, राष्ट्रीय अल्पसंख्याक परिषदेचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष पत्रकार महेताब शेख, पत्रकार राजेश बंडे,भास्कर पवार,पाळ्याचे चेअरमन पुष्पाताई डुमणे, माजी सरपंच सुरेश पाटील, उपसरपंच सुभाष पाटील डुमणे, बालाजी पाटील वडजे, विजय पाटील डुमणे, उद्धव पाटील उमाटे, रमेश पाटील डुमणे,पिराजी सकीनवार, नागनाथ कोंडेवाड,माजी सैनिक हाममंत दिंडे, बाळु डुमणे, ग्रामपंचायत सदस्य रमेश मुंजेवार, माधव उमाटे, राजू तोटरे तसेच शिवाजी पाटील उमाटे , गंगाधर कांबळे, बाबुसाब पटेल, मेहबूब शेख,मोतीपाशा शेख, पांडुरंग तुपदाळे यांची प्रमुख उपस्थिती होती. सदर कार्यक्रमाची सुरुवात कुळवाडीभुषण छत्रपती शिवाजी महाराज,भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन दिपप्रज्वलनाने करण्यात आली. यावेळी पोलीस निरीक्षक रमेश वाघ व गौतम काळे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करत आपले विचार मांडले तसेच गुणवंताना पुढील यशस्वी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे प्रस्ताविक सैनिक फेडरेशनचे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर पाटील डुमणे यांनी केले तर सुत्रसंचलन बजरंग पाटील पाळेकर,सहशिक्षक रवींद्र ढगे यांनी केले. उपस्थितांचे आभार माधव पाटील डुमणे यांनी मानले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी सहशिक्षक रवींद्र ढगे, बजरंग पाटील,माधव पाटील डुमणे, बालाजी आईनवाड यांच्यासह राजे छत्रपती अॅकडमीच्या विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले. याप्रसंगी पाळा गावातील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन, व्हाईस चेअरमन, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष, प्रतिष्ठित नागरिक, पालक, विद्यार्थी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button