सामाजिक

वरिष्ठ लिपिक माधव तोटवाड यांच्या मातोश्री व्यंकुबाई तोटवाड यांचे निधन

मुखेड: येथील उपजिल्हा रुग्णालयातील वरिष्ठ लिपिक माधव हणमंतराव तोटवाड यांच्या मातोश्री व्यंकुबाई हणमंतराव तोटवाड यांचे आज रविवारी पहाटे ६ वाजण्याच्या सुमारास वृद्धापकाळाने निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय ७५ वर्षे होते.

त्यांच्या निधनाने तोटवाड परिवारावर शोककळा पसरली असून, उपजिल्हा रुग्णालयातील अधिकारी व कर्मचारी वर्गासह स्थानिक नागरिकांनी तोटवाड कुटुंबियांचे सांत्वन केले आहे. त्यांच्या पश्चात मुलगा, सून, नातवंडे असा मोठा परिवार आहे.

. व्यंकुबाई तोटवाड यांच्या पार्थिवावर आज सायंकाळी ४:०० वाजता उमरदरी वाडी येथे अंत्यसंस्कार (अंत्यविधी) करण्यात येणार असल्याचे कुटुंबियांकडून सांगण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button