क्राईम

आंबुलगा सेवा सहकार सोसायटीत सेक्रेटरीचा अजब कारभार! संचालकांना अंधारात ठेवून ठरावावर घेतल्या सह्या; मुखेड सहाय्यक निबंधकांकडे तक्रार

मुखेड प्रतिनिधी :- श्रमिक एकता न्यूज़ १५ जून २६

तालुक्यातील मौजे आंबुलगा येथील सेवा सहकार सोसायटीमध्ये सेक्रेटरीच्या मनमानी आणि अजब कारभाराचा धक्कादायक प्रकार समोर आला आहेसंचालक मंडळाची दिशाभूल करूनकोणतीही पूर्वसूचना किंवा बहुमताची रीतसर बैठक  घेताखरेदीविक्री संघाचा ठराव बेकायदेशीर रित्या मंजूरकरून घेतल्याचा खळबळजनक आरोप संचालकांनीच केला आहेयाप्रकरणी संतप्त संचालकांनी १० जून रोजी मुखेड येथील सहाय्यक निबंधक कार्यालयात लेखी तक्रार दाखल केली असूनसोसायटीत नेमके काय शिजतेयअसा सवाल आता उपस्थित केला जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसारआंबुलगा सेवा सहकार सोसायटीच्या सेक्रेटरीने खरेदीविक्री संघाचा ठराव मंजूर करून घेण्यासाठी सर्व नियम धाब्यावर बसवलेकोणतीही अधिकृत बैठक  घेतासेक्रेटरीने प्रत्येक संचालकाची वैयक्तिक भेट घेतली. “तुमचे कर्ज मंजूर करून देतो,” असे खोटे आमिष दाखवूनआणि त्यांच्या अज्ञानपणाचा गैरफायदा घेऊन हुशारीने खरेदीविक्री संघाच्या ठरावावर स्वाक्षऱ्या लाटल्याहा प्रकार उघडकीस आल्यानंतर सोसायटीच्या वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

विशेष आणि गंभीर बाब म्हणजेया आंबुलगा सेवा सहकार सोसायटीचे चेअरमन हे दुसरे तिसरे कोणी नसून मुखेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान सभापती बालाजीराव पाटील अंबुलगेकर हे आहेतमुखेड तालुक्याच्या कृषी आणि सहकार क्षेत्राचे नेतृत्व करणाऱ्या सभापतींच्या स्वतःच्या गावातील सोसायटीत जर संचालकांचा असा ‘अज्ञानपणाचा‘ फायदा घेऊन फसवणूक केली जात असेलतर कृषीउत्पन्न बाजार समितीत नेमका कसा कारभार चालत असेलतिथे कोणता काळा बाजार होत असेलअशी भीती आणि काळजी आता सर्वसामान्य शेतकऱ्यांमधून व्यक्त केली जात आहे.

सेक्रेटरीच्या या मनमानी कारभारा विरोधात काही जागरूक संचालकांनी थेट सहाय्यक निबंधक कार्यालय गाठून लेखी तक्रार नोंदवली आहेआता या गंभीर प्रकरणावर मुखेडचे सहाय्यक निबंधक काय भूमिका घेतातदोषी सेक्रेटरीवर कडक कायदेशीर कारवाई होणार कीआलेला तक्रार अर्ज नेहमी प्रमाणे सरकारी लालफितीत (दप्तरदीरंगाईतधूळ खात पडणारयाकडे आता संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागून राहिले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button