शहर

कासार समाजातील तरुणाची उत्तुंग भरारी! डॉ. बिलाल हैदर परदेशी यांचे वैद्यकीय शिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण


मुखेड प्रतिनिधी:- श्रमिक एकता न्यूज १५ जून २६

मुखेड येथील कासार समाजातील युवकांने वैद्यकीय शिक्षण पूर्ण करून डॉक्टर होण्याचे स्वप्न पूर्ण केले आहे. मुखेड नगरपालिकेचे माजी नगरसेवकाच्या मुलांने एमबीबीएस पदवी अखेर प्राप्त केली आहे.
मुखेड नगरपालिकेचे माजी नगरसेवक हैदर परदेशी तथा नोबेल उर्दू माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापिका सायरा बानू परदेशी यांचे चिरंजीव बिलाल हैदर परदेशी यांनी वैद्यकीय शिक्षण नुकतेच पूर्ण केले आहे व एमबीबीएस पदवी प्राप्त करून डॉक्टर होण्याचे स्वप्न पूर्ण केले आहे. कासार समाजातील नांदेड जिल्ह्यातील तो पहिला डॉक्टर होण्याचा मान मिळविला आहे. डॉ. बिलाल परदेशी यांनी प्राथमिक शिक्षण मुखेड येथील शाहीर आण्णाभाऊ साठे विद्यालयात पूर्ण केले आहे व उच्च माध्यमिक शिक्षण केंब्रिज विद्यालय नांदेड येथे पूर्ण केले आहे. त्यानंतर त्यांनी एमबीबीएस चे वैद्यकीय शिक्षण विठ्ठलराव विखे पाटील मेडिकल कॉलेज अहिल्या नगर येथे पूर्ण केले आहे. कासार समाजातील मुलगा अखेर डॉक्टर झाल्यामुळे अनेकांनी आनंद व्यक्त केला आहे. वडील अभियंता तर आई मुख्याध्यापिका असलेल्या चिरंजीवाने डॉक्टर होण्याचे स्वप्न पूर्ण केले आहे. मुखेड येथील माजी नगरसेवक हैदर अली परदेशी यांचा मुलगा डॉक्टर बिलाल परदेशी यांनी वैद्यकीय शिक्षण पूर्ण केल्याबद्दल माजी आमदार अविनाश घाटे, सेवानिवृत्त अभियंता जिलानी परदेशी व अनेकांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button