अधिकाऱ्यांनी राजकीय पक्षाशी संबंध ठेवू नये:- सहायक निवडणूक निर्णय अधिकारी जंगम

मुखेड : प्रतिनिधी
लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सध्या सर्वत्र आदर्श आचारसंहिता सुरु असून या काळात सर्व मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांनी कुठल्याही राजकीय पक्षाशी संबंध ठेऊ नये असे आवाहन देगलुरचे उपविभागीय अधिकारी तथा ९१ विधानसभा मतदारसंघाचे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी कुलदीप जंगम यांनी केले आहे. ते सर्व पर्यवेक्षक व मतदान केंद्रस्तरीय अधिकारी, बिएलओ यांची लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने घेण्यात आलेल्या बैठकीत बोलत होते. सदर बैठकीमध्ये पर्यवेक्षक व मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांना अनेक सूचना देण्यांत आल्या यामध्ये ८५ वषार्पेक्षा जास्त वय असलेल्या मतदारांची यादी फॉर्म नंबर १२ ड सोबत सादर करण्यांत यावी तसेच
दिव्यांग पिडब्लुडी मतदाराची यादी फॉर्म नंबर १२ ड सोबत सादर करावी त्याचबरोबर अनुपस्थित, स्थल तरीत, मयत एएसडी मतदारांची यादी सादर करावी, मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांनी स्वतःचे मतदानासाठी १२ व १२ अ फॉर्म भरून सादर करावे
तसेच मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांनी आप-आपल्या मतदान कें द्रावर रँप, विद्युत व्यवस्था, फर्निचर मतदारांसाठी लागणा-या इतर सोयीसुविधा उपलब्धतेबाबतचा अहवाल सादर करावा अशा महत्वपूर्ण सूचना सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी कुलदीप जंगम यांनी बिएलओ यांना दिल्या आहेत.
त्याचबरोबर सर्व सर्व पर्यवेक्षक व मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांना आचारसहिंतेच्या कालावधीत कुठल्याही राजकिय पक्षाशी संबंध ठेवु नये असे आवाहन करण्यात आले आहे. यावेळी तहसीलदार राजेश जाधव, गटविकास अधिकारी सि.एल. रामोड, निवडणूक विभागाचे नायव तहसीलदार अशोक लबडे, नंदकिशोर भोसीकर, पांडुरंग गंगनर, एआर ऑफीसचे होनराव, महसूल सहाय्यक संदीप भुरे सह सर्व पर्यवेक्षक व मतदान केंद्रस्तरीय अधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते.



