Uncategorized

उमरदरी ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांकडून पंप ऑपरेटरला जीवे मारण्याची धमकी

मुखेड प्रतिनिधी:- २२ सप्टेंबर 

मुखेड तालुक्यातील उमरदरी ग्रामपंचायतचे पंप ऑपरेटर झकेरिया युसुफ खान पठाण यांना ग्रामविकास अधिकारीउपसरपंचग्रामपंचायत सदस्य वकाही ग्रामस्थांकडून जीवे मारण्याची धमकी मिळाल्याची तक्रार जिल्हाधिकारी नांदेड यांच्याकडे निवेदन देऊन केली आहे.

महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कामगार सेनेच्या पत्रावर आधारित या तक्रारीत झकेरिया पठाण यांनी नमूदकेले आहे कीवेळोवेळी अर्ज करूनही त्यांना वेतनराहणीमान भत्ताभविष्य निधीअपघात विमासार्वजनिक टाकी दुरुस्ती साहित्य  गणवेश उपलब्ध करून देण्यात आले नाहीया संदर्भात चौकशीची मागणी केल्यानंतर पदाधिकारी आणि काही ग्रामस्थांनी त्यांना विनाकारण त्रास देत जीवे मारण्याची धमकी दिली असल्याचे त्यांनी निवेदनात म्हटले आहे.

झकेरिया पठाण यांनी आपल्या जीवितास धोका असल्याने संरक्षण देण्याची मागणी केली असूनधमकी देणाऱ्यां विरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याची विनंती जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहेया प्रकारामुळे ग्रामपंचायतीतील गैरप्रकार उघडकीस आले असूनपुढे वरिष्ठ अधिकारी काय कार्यवाही करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button