Uncategorized

महिलेची चेन चोरून पळणाऱ्या दोन आरोपींना वजीराबाद पोलिसांनी केली गजाआड


नांदेड प्रतिनिधी
दि 19 सप्टेंबर रोजी सायंकाळी 5 वाजता शहरातील तरोडानाका परिसरामधील दोन चोरट्यांनी मोटरसायकलवर येऊन एका महिलेच्या गळ्यातील सोन्याची चैन चोरून घेउन पळणाऱ्या दोघांना वजीराबाद पोलिसांनी पकडून बेड्या ठोकून गजाआड केले आहे
सविस्तरव्रत असे की शहरांमध्ये दिवसेंदिवस महिलेच्या गळ्यातील मौल्यवान वस्तू चैन जबरदस्ती घेउन फळ काढला होता याबाबतची तक्रार भाग्यनगर पोलीस ठाण्यामध्ये दाखल झाली होती
पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांच्या आदेशावरून शहरातील महिलांचे दागिने चैन चोरणाऱ्या आरोपीचा शोध घेण्यासाठी आदेश देण्यात आले होते त्यानुसार वजीराबाद पोलिसांनी गुप्त खबरीच्या माहितीवरून खडकपुरा भागातील पाण्याच्या टाकीजवळ एक स्प्लेंडर प्लस व दोघेजण थांबल्याची माहिती मिळाली त्यावरून पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड यांनी त्वरित पथकासह त्या ठिकाणी जाऊन आरोपींना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांच्या खिशामध्ये चैन व वस्तू मिळाल्या त्यावरून त्यांनी दोन्ही आरोपींना अटक करून वजीराबाद पोलीस स्टेशन येथे आणुन बेड्या ठोकून त्यांच्या जवळील मोटर सायकल व वस्तू असा एक लाख 78 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून आरोपींना अटक केली आहे

पुढील तपासकामी भाग्यनगर पोलीस स्टेशन यांच्याकडे देण्यात आलेला आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button