क्राईम

नांदेड परिक्षेत्रात पोलिसांची धडक कारवाई; किनवटमध्ये जुगार अड्ड्यावर छापा, एकाच दिवसात ५४ लाखांचा मुद्देमाल जप्त

किनवट प्रतिनिधी:- श्रमिक एकता न्यूज़ १८ मे २६

नांदेड परिक्षेत्रात सध्या अवैध व्यवसायांविरुद्ध विशेष मोहीम तीव्र करण्यात आली असून या मोहिमेच्या सोळाव्या दिवशी पोलीस उप महानिरीक्षक यांच्या विशेष पथकाने किनवट येथे सुरू असलेल्या मोठ्याजुगार अड्ड्यावर छापा टाकून धडक कारवाई केली आहेदिनांक  ते ३१ मे २०२६ दरम्यान राबविल्या जाणाऱ्या या अवैध व्यवसाय विरोधी मोहिमेदरम्यान परिक्षेत्रात गेल्या २४ तासांत विविध अवैध धंद्यांवरतब्बल १०३ गुन्हे दाखल करण्यात आले असून १२६ इसमांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात आली आहेया सर्व कारवायांमध्ये पोलिसांनी एकूण ५३,९३,११२ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

या मोहिमेत नांदेड जिल्ह्यातील किनवट पोलीस ठाणे हद्दीतील दत्तनगर गोकुंदा येथे ‘तिर्रट‘ नावाचा जुगारखेळला जात असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्यावरून पोलीस उप महानिरीक्षक यांच्या अधिपत्याखालील पथकाने तेथे छापा टाकलाया कारवाईत पोलिसांनी जुगार खेळणाऱ्या  इसमांनारंगेहात पकडून त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून त्यांच्याकडून रोख रकमेसह ,८८,९०० रुपयांचामुद्देमाल हस्तगत केला आहेया धडक कारवाईसोबतच परिक्षेत्रात इतर ठिकाणीही अवैध धंद्यांवर मोठे प्रहार करण्यात आले आहेतयात बेकायदेशीर गुटखा विक्री करणाऱ्या  इसमांविरुद्ध कारवाई करूनत्यांच्याकडून ,०८,९९० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहेतर मटका आणि जुगार खेळणाऱ्या  खेळविणाऱ्या एकूण ३३ इसमांविरुद्ध महाराष्ट्र जुगार कायद्याअंतर्गत १२ गुन्हे दाखल करून ११,८६,३९० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

तसेच अवैध दारू विक्री करणाऱ्या ७९ इसमांविरुद्ध ७८ गुन्हे दाखल करून ,०४,२४६ रुपयांची दारू इतर साहित्य जप्त करण्यात आले आहेपर्यावरणाची हानी करणाऱ्या अवैध वाळू उपसा करणाऱ्यांवरही पोलिसांनी कडक पावले उचलली असून त्यांच्याविरुद्ध  गुन्हे दाखल करून ३०,१५,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहेया सर्व कारवायां सोबतच शस्त्र अधिनियमान्वये कोटपा अन्वये  आणि इतर कायद्यांखाली एकूण कारवायांचा आकडा १०३ वर पोहोचला असून यात निष्पन्न झालेल्या सर्वआरोपींकडून एकूण ५३ लाख ९३ हजार ११२ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

परिक्षेत्रातील अवैध व्यवसायांची माहिती थेट पोलिसांना देता यावी आणि गुन्हेगारीला आळा घालतायावाया दृष्टिकोनातून पोलीस उप महानिरीक्षक कार्यालयाने ९१ ५० १०० १०० हा मोबाईल क्रमांकअसलेली ‘खबर‘ नावाची विशेष हेल्पलाईन सुरू केली आहेया हेल्पलाईनला नागरिकांचा अत्यंत वाढताआणि सकारात्मक पाठिंबा मिळत आहेनागरिकांनी आपल्या भागातील कोणत्याही अवैध व्यवसायांचीमाहिती या क्रमांकावर फोन करून अथवा व्हॉट्सॲप मेसेजद्वारे पाठवावीअसे आवाहन पोलीस उपमहानिरीक्षक श्रीशहाजी उमाप यांनी केले असून माहिती देणाऱ्याचे नाव पूर्णपणे गुप्त ठेवले जाईलअसेही पोलीस उप महानिरीक्षक कार्यालयनांदेड परिक्षेत्राकडून सांगण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button