Uncategorized

१४ फेब्रुवारीला मुखेड बंद चे पुकार:- सखल मराठा समाज 

मुखेड प्रतिनिधी:- आसद बल्खी

मराठा आरक्षणासंबंधी काढण्यात आलेल्या अधिसूचनेचे कायद्यात रुपांतर करून तातडीने अंमलबजावणी सुरू करावी, या मागणीसाठी मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी आंतरवाली सराटी येथ पुन्हा बेमुदत उपोषण सुरू केले आहे. त्यांना पाठिंबा म्हणून सखल मराठा समाजाच्या च्या वतीने बुधवारी १४ फेब्रुवारी संपूर्ण महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. त्याचाच भाग म्हणून मुखेड शहर  बंद पुकारण्यात येत असल्याची माहिती स्थानिक संयोजकांनी दिली.

मुखेड स्थानिक पदाधिकाऱ्यांनी मुखेड प्रशासनाला या आंदोलनाची पत्राद्वारे माहिती दिली आहे. त्यांनी म्हटले आहे, मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी १० फेब्रुवारीपासून संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी बेमुदत उपोषण सुरु केले आहे. सर्वसामान्य मराठा समाज आरक्षणासाठी शांततेत मोर्चे काढून सरकारला आरक्षणाची मागणी करीत आहे. सरकारला पुरेसा वेळ देऊनही सरकार वेळ काढूपणा करत आहे.

जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठींबा म्हणून सकल मराठा समाज  यांच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्र बंद आंदोलनाची हाक देण्यात आली आहे. त्याचाच भाग म्हणून मुखेड  बंद  व रस्ता रोको आंदोलन पुकारण्यात येत आहे, असे निवेदन देण्यात आले आहे. यावर सचिन पा इंगोले, शिवकुमार पा राजूरकर,बालाजी पा वडजे,योगेश पा जाधव,बालाजी पा इंगोले,अविनाश पा मसलगेकर,सचिन पा चिखलीकर,बालाजी गणेशराव इंगोले,दिपक पा जुने,विश्वा गायकवाड,शिवराज पाटील,बजरंग पा पाळेकर,शरद पा इंगोले ईतर कार्यकर्तेचे सह्या आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button