आज केज येथे शेतकरी कामगार पक्षाचा विभागीय मेळावा

केज प्रतिनिधी :- ०८ जून २५
शेतकरी कामगार पक्षाचा विभागीय मेळावा ८ जुन रोजी सकाळी ११ वाजता येथे जे. के. फंक्शन हॉल(मंगल कार्यालय) फुलेनगर केज येथे होणार आहे.
या मेळाव्याला शेकापचे सरचिटणीस माजी आमदार भाई जयंत पाटील, माजी आमदार भाई बाळारामपाटील. आमदार डॉ बाबासाहेब देशमुख, पक्षाचे शेतकरी सभा प्रदेशाध्यक्ष भाई एस. व्ही. जाधव सर, पक्षाचे खजिनदार भाई अतुल म्हत्रे, कार्यालयीन चिटणीस ड. राजेंद्र कोरडे, सहचिटणीस भाई बाबासाहेब देवकर, कार्यालयण सहचिटणीस भाई प्रा. उमाकांत राठोड, महिलांच्या प्रदेश चिटणीस मानशी म्हात्रे. जेष्ठ नेते भाई बाबुराव लगारे, बाधित शेतकरी महामार्ग आघाडीचे भाई दिगंबर कांबळे, शिक्षक आघाडीचेप्रा. चंद्रकांत चव्हाण, अल्पसंख्याक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष भाई युनुस पाठाण, राज्य चिटणीस मंडळसदस्य डॉ. अनिकेत देशमुख, चिटणीस मंडळ सदस्य ड. उदय गवारे, चिटणीस मंडळ सदस्य भाई विकासशिंदे, चिटणीस मंडळ सदस्य चित्रलेखा गोळेगावकर, विद्यार्थी आघाडी साम्या कोरडे यांच्यासहमराठवाड्यातील सर्व मध्यवर्ती समितीचे सदस्य जिल्हाप्रमुख तालुका प्रमुख मान्यवर उपस्थित रहाणारअसल्याची माहिती भाई मोहन गुंड यांनी दिली आहे.
या मेळाव्यात शेतकरी कामगारांच्या प्रश्नावर चळवळ उभी करण्यासाठी विविध ठराव घेण्यात येणारआहेत. तसेच, मराठवाडा विभागातील प्रमुख पदाधिकाऱ्याच्या निवडी देखील या मेळाव्यामध्ये करण्यातयेणार आहेत. मराठवाडा विभागातील सर्व प्रमुख कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे. असे, आवाहन भारतीयशेतकरी कामगार पक्षाच्या वतीने करण्यात आला आहे.




