Uncategorized

गाढ झोपेत अंगावर घरातील भिंत कोसळली; वृद्ध दाम्पत्याचा दुर्दैवी मृत्यू 

कंधार प्रतिनिधी :- १६ ऑगस्ट २५

कंधार तालुक्यात एक मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहेवृद्ध पती पत्नीच्या अंगावर भिंत कोसळून दोघांचाही जागेवर दुर्दैवी मृत्यू झाला आहे . दि १५ ऑगस्ट शुक्रवारी हे जोडपं रात्री जेवण करून घरात झोपलं होतंपण मध्यरात्री काळाने त्यांच्यावर झडप घातलीदुर्घटनेत झोपलेल्या ठिकाणीच दोघांचा मृत्यू झाला आहे.

सविस्तर माहिती अशी की कंधार तालुक्यातील कोटबाजार येथील शेख नासेर (वय अंदाजे ७० वर्षेआणि त्यांची पत्नी शेख हसीना (वय अंदाजे ६५ वर्षेहे दोघे त्यांच्या कच्च्या मातीच्या घरात रात्री झोपले होतेगेल्या दोन दिवसांपासून तालुक्यात सतत पाऊस पडत असल्यामुळे घराच्या मातीच्या भिंती कमकुवत झाल्या होत्याशुक्रवारी मध्यरात्री अचानक त्यांच्या खोलीची भिंत त्यांच्या अंगावर कोसळली.भिंत कोसळल्याचा आवाज ऐकून आजूबाजूचे लोक जागे झाले आणि त्यांनी तत्काळ घटनास्थळी धावघेतलीमातीच्या ढिगाऱ्याखाली दाबल्या गेलेल्या या वृद्ध दाम्पत्याला बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू झालेपरंतु भिंतीचा ढिगारा मोठा असल्यामुळे त्यांना बाहेर काढण्यात अडचण येत होतीअखेरस्थानिकांनी मोठ्या प्रयत्नांनी त्यांना बाहेर काढलेपण तोपर्यंत त्यांचा जागीच मृत्यू झाला होता. याघटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस आणि प्रशासकीय अधिकारी घटनास्थळी पोहोचलेत्यांनीपंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवलेया घटनेमुळे संपूर्ण गावात हळहळ व्यक्त होत आहेपावसाळ्याच्या दिवसांत अशा प्रकारच्या घटना घडण्याची शक्यता असल्यामुळे कच्च्या घरात राहणाऱ्या नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावीअसे आवाहन प्रशासनाने केले आहेया दुर्दैवी घटनेने शेख कुटुंब आणि त्यांच्या गावावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button