क्राईम

भरदिवसा बंद घर फोडले; ३ लाखाचा  ऐवज लांबविला ! नागरिकात भीतीचे वातावरण

मुखेड प्रतिनिधी:-

मुखेड शहरातील दीपनगर भागातील एका शिक्षक दाम्पत्याचे बंद घराचे कडी कोंडा तोडून आत प्रवेश करतरातून सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण  लाख रुपये किमतीचा ऐवज अज्ञात चोरट्यांनीचोरून नेल्याची धक्कादायक घटना उघडकीला आले आहे

शहरातील मध्यवर्ती भागतील घरात घरफोडी झाल्याने नागरिकात भीतीचे वातावरण पसरले आहे ही घटना११ डिसेंबर रोज बुधवारी दुपारी  वाजेच्या दरम्यान घडली आहेघटनास्थळी पोलिस प्रशासनाने श्वानपथकास पाचारण केले आहे.

या बाबत सविस्तर वृत्त असे की शहरातील दीपनगर भागात दादाराव आगलावे यांचे चैतन्य निवास हे घरआहेदररोजच्या दिनक्रमा प्रमाणे दादाराव आगलावे आणि त्यांची पत्नी सौशिला आगलावे हे दोन्हीशिक्षक दाम्पत्य शाळेत कर्तव्यासाठी गेले असता घरी कुणीही नसल्याचे संधी साधून अज्ञात चोरट्यानेघराचे कडी कोंडा तोडून भरदिवसा ११ रोजी बुधवारी दुपारी  वाजता धाडसी चोरी केली आहे.

यात घरातील लोखंडी कपाटातील ३५ ग्राम सोन्याचे दागिने नगदी १० हजार रु लंपास केल्याची माहितीसमोर आली आहेसौशीला आगलावे हे शाळेच्या मध्यंतरामध्ये घरी आले आसता घरातील दरवाजे कुलूपकोंडी तुटून दरवाजा उघडा असल्याचे दिसून आलेमुख्य गेटला कुलूप होते.

घरात गेल्यावर त्यांना चोरी झाल्याचे दिसून आले असता त्या क्षणी त्यांना धक्का बसलादादाराव आगलावेयांनी पोलिस प्रशासनस ही बाब कळवली असता पोलिस निरीक्षक लक्ष्मण केंद्रेफौजदार चव्हाण यांनीघटनास्थळी भेट दिली  पाहणी केली.

नांदेड येथील श्वान पथकास पाचारण केले आहेदादाराव आगलावे यांच्या घरी धाडसी चोरी भरदिवसाझाल्याने परिसरातील नागरिक भयभीत झाले आहेतसदरील घटनेची सायंकाळी उशिरा मुखेड पोलिसठाण्यात गुन्हा नोंदविण्याचे प्रक्रिया सुरू असल्याचे माहिती प्राप्त झाली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button