क्राईम

गुंगीचं औषध देत लैंगिक अत्याचार; नराधम शिक्षकाच्या कृत्याने नांदेड हादरलं

तामसा प्रतिनिधी:-

माणुसकीला काळीमा फासणारी घटना नांदेडमध्ये घडल्याचे उघड झाले आहे. हदगाव तालुक्यातील तामसा येथील शिक्षकांने गुरू-शिष्य परंपरेला काळीमा फासत इयत्ता दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीवर बलात्कार केला आहे. शिक्षकाने विद्यार्थीनीला गुंगीचे औषध दिले आणि तिच्यावर एकदा नाहीतर अनेकवेळा अत्याचार केल्याचे समोर आले आहे. घटनेच्या निषेधार्थ तामसा शहर कडकडीत बंद करण्यात आले आहे.

नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यातील तामसा येथे शिक्षकाने अल्पवयीन विद्यार्थिनीवर गुंगीचे औषध देऊन बलात्कार केल्याची घटना घडली आहे. नंतर आरोपीने वारंवार मुलीवर अत्याचार केले. त्यातून विद्यार्थिनी गरोदर राहिली तिचा गर्भपात देखील करण्यात आला . ही घटना मुलींच्या कुटुंबीयांना कळाली, त्यानंतर त्यांच्या देखील पायाखालची जमीन सरकली. नंतर मुलीच्या तक्रारीवरुन आरोपी शिक्षक राजू सिंग चौहान विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला . या घटनेच्या निषेधार्थ आज तामसा बंद पाळण्यात आला . नागरिकांनी पोलीस ठाण्यात जाऊन आरोपीला अटक करुन कठोर शिक्षा करण्याची मागणी केली .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button