क्राईम

मुखेडचे पोलीस निरीक्षक लक्ष्मण केंद्रे यांच्यावर गंभीर आरोप; तात्काळ बडतर्फ करण्याची सामाजिक संघटनांची मागणी!

मुखेड प्रतिनिधी : – श्रमिक एकता न्यूज़ १९ मे २६

मुखेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक लक्ष्मण व्यंकटराव केंद्रे यांच्या भ्रष्टाचारीअत्याचारी कारभारा विरुद्ध आणि सामान्य जनतेवर होत असलेल्या अमानुष छळाविरुद्ध सामाजिक कार्यकर्त्यांनी थेट विशेषपोलीस महानिरीक्षक (नांदेड परिक्षेत्रयांच्याकडे लेखी तक्रार नोंदवली आहेपोलीस निरीक्षक केंद्रे यांनासेवेतून तात्काळ बडतर्फ करून त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावाअशी मागणी या पत्राद्वारे करण्यात आली असूनमागणी मान्य  झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.

 तक्रारदारांनी आरोप केला आहे कीमुखेड पोलीस स्टेशनमध्ये तक्रार घेऊन जाणाऱ्या सामान्य नागरिकांनाच बेदम मारहाण केली जातेत्यांच्याकडून मोठ्या प्रमाणावर पैसे उकळले जातात आणि पैसे दिल्यास खोट्या गुन्ह्यांमध्ये अडकवून जेलमध्ये टाकण्याची धमकी दिली जाते.

 मुखेड परिसरात दररोज ५० ते ६० गाड्यांची अवैध रेती वाहतूक सुरू असूनएका गाडीमागे तब्बल ३०,००० रुपये घेऊन या वाहतुकीला थेट पाठबळ दिले जात असल्याचा खळबळजनक आरोप पत्रात करण्यात आला आहे.

 मुखेड शहरात सर्रास सुरू असलेले सट्टा बाजारपत्ते आणि गांजा विक्री यांसारख्या अवैध धंद्यांना पोलीस निरीक्षकांचाच वरदहस्त असल्याचा दावा तक्रारदारांनी केला आहे.

विशाल राजेंद्र सांगवे या सामान्य नागरिकावर झालेल्या अन्यायाबाबत १३ एप्रिल २०२६ रोजी प्राप्त झालेल्या अर्जाचा हवाला देत तक्रारदारांनी म्हटले आहे कीपीडित माणसावर प्रचंड दबाव टाकूनत्याला  लाख रुपये देऊन उपचारासाठी पुणे येथील रुग्णालयात पाठवण्यात आले आहेजेणेकरून या गंभीर प्रकरणावर पडदा टाकता येईल.

या अन्यायाविरुद्ध बहुजन समाज पार्टीचे हणमंतभाऊ अंगदराव मामीलवाड ठाणेकर (उपाध्यक्षमाहितीअधिकार कार्यकर्ता महासंघआणि सचिन पाटील इंगोले (संस्थापक अध्यक्षराजमुद्रा सामाजिकसंघटनायांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.

या भ्रष्ट कारभाराची चौकशी करून पोलीस निरीक्षक केंद्रे यांना तातडीने निलंबित  बडतर्फ करावेआमच्या जीवाला या पोलीस अधिकाऱ्यापासून धोका असूनकाही बरेवाईट झाल्यास तेच जबाबदार राहतीलप्रशासनाने योग्य कारवाई  केल्यास २८ मे २०२६ रोजी विशेष पोलीस महानिरीक्षक कार्यालय, नांदेड समोर उपोषण केले जाईल आणि त्यानंतरही न्याय  मिळाल्यास ३ जून २०२६ पासून मुंबईतील आझाद मैदान येथे आमरण उपोषण करण्यात येईल,” असा इशारा अर्जदारांनी दिला आहे.

या गंभीर तक्रारीमुळे पोलीस वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली असूनआता वरिष्ठ पोलीस प्रशासन यावरकाय कारवाई करणारयाकडे संपूर्ण मुखेड तालुक्याचे लक्ष लागले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button