क्रीडा

म.ज्यो.फुले महाविद्यालयात नेहरू युवा केंद्राची तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा यशस्वी

मुखेडप्रतिनिधी :-
येथील महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभाग , क्रीडा विभाग आणि नेहरू युवा केंद्र , नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा यशस्वीपणे संपन्न झाला . तालुक्यातील विविध शाळा , महाविद्यालयातील 15 – 29 या वयोगटातील विद्यार्थी व विद्यार्थिनींनी सहभाग घेतला होता .
उद्घाटन व बक्षीस वितरण कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रस्तुत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस.बी.अडकिणे , उद्घाटक नांदेड च्या नेहरू युवा केंद्राचे जिल्हा युवा अधिकारी चंदा रावळकर , प्रमुख पाहुणे उपप्राचार्य प्रा.एस.बी.बळवंते , तालुका क्रीडा समन्वयक प्रा.पोटफोडे हे उपस्थित होते . कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन रासेयो कार्यक्रमाधिकारी प्रा.डॉ. चंद्रकांत एकलारे तर आभार प्रदर्शन क्रीडा निर्देशक प्रा.डॉ. संजय गायकवाड यांनी केले .
विजेत्या संघाला व स्पर्धकांना सन्मानचिन्ह , प्रमाणपत्र व गुलाबपुष्प देऊन गौरविण्यात आले . यामध्ये मुलांच्या कबड्डी स्पर्धेत महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयाचा संघ प्रथम क्रमांक तर द्वितीय क्रमांक विद्यानिकेतन पब्लिक स्कूल , कमळेवाडी , खो – खो मुलींच्या संघात प्रथम क्रमांक माध्यमिक आश्रमशाळा , कमळेवाडी व द्वितीय क्रमांक विद्यानिकेतन पब्लिक स्कूल , कमळेवाडी , 100मी.धावणे मुलीमध्ये प्रथम कु. जान्हवी डावकरे व द्वितीय कु.प्रणिता विभूते , 100 मी.मुलामध्ये प्रथम राठोड प्रवीण व द्वितीय अतिश जाधव , गोळाफेक मुलीत प्रथम व द्वितीय , गोळाफेक मुलामध्ये प्रथम भारती माधव व द्वितीय क्रमांक अतिश जाधव पटकावला आहे . सदरील यशवंताना मान्यवरांच्या हस्ते अभिनंदनीय सत्कार करण्यात आला .
उद्घाटक चंदा रावळकर यांनी नेहरू युवा केंद्राला महाविद्यालयाच्या सहकार्याबद्दल आभार मानले . विजयी संघाचे अभिनंदन करून पराजित संघाला नवी उर्जा घेऊन स्पर्धेत सहभागी होण्यासाठी मौलिक सल्ला दिला . या केंद्रातील उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन केले . अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. अडकिणे यांनी स्पर्धा म्हटल्यावर यश – अपयश हे निश्चितच मिळणार आहे . सामन्यात एकमेकांचा द्वेष करण्याऐवजी सौहार्दाचे वातावरण निर्माण करणे आवश्यक आहे . मैदानी खेळातून अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर नावलौकिक मिळवता येते . प्रत्येक संघ हा ताकत व डावपेच आखून मैदानात उतरून आपले कौशल्य दाखवत असतो . उभारी घेण्यासाठीच नेहरू युवा केंद्रातील तालुका स्तरावरील स्पर्धा आयोजित करण्यात आले होते असे मोलाचे मार्गदर्शन केले .
या स्पर्धेत पंच म्हणून प्रा.डॉ. बी.टी.पाटील , प्रा.डॉ. शिवसर्जन टाले , प्रा.डॉ. अर्जुन गजमल , प्रा.ओमप्रकाश राजारुपे , एन.आर.पोटफोडे यांनी सहकार्य केले . विविध शाळा , महाविद्यालयाचे संघ व्यवस्थापक म्हणून एस.जी.जाधव , सुर्यवंशी , सिध्दांत कांबळे , ओमप्रकाश मंडलेवाले , श्रीमती सोनवणे , प्रा.गजानन शिवशेट्टे , प्रा.शिंदे यांनी उत्तम कामगिरी बजावली आहे . यशस्वितेसाठी प्रा.डॉ. जयदीप कहाळेकर यांचे सहकार्य लाभले . दिमाखदार कार्यक्रम पाहण्यासाठी तालुक्यातील क्रीडाप्रेमी , प्राध्यापक , शिक्षकेत्तर कर्मचारी , विद्यार्थी उपस्थित होते .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button