क्रीडा

मुख्यमंत्री चषक कबड्डी स्पर्धेसाठी नांदेड जिल्ह्या संघामध्ये ओमप्रकाश मंडलेवाले यांची नुकतीच निवड 

मुखेड/प्रतिनिधी:- 

७२ व्या राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेची गटवारी जाहीर करण्यात आली आहे 

नांदेड जिल्हा कबड्डी असोसिएशन संघात मुखेड तालुक्याचा सुपुत्र ओमप्रकाश मंडलेवाले  यांची ७२वी प्रॉड गट (पुरुष ) राज्य अजिंक्यपद  निवड चाचणी कबड्डी स्पर्धा २०२५ मध्ये नुकतीच निवड करण्यात आली तो नांदेड जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या संघातून खेळणार आहे.

ठाणे येथे होणाऱ्या ७२व्या वरिष्ठ गट पुरुषमहिला राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेची गटवारी जाहीर करण्यात आली आहे.

महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशनविश्वास सामाजिक संस्थाठाणे यांच्या सहकार्याने “७२व्या वरिष्ठ गट पुरुष  महिला राज्य अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेचे” आयोजन करीत आहे.

ठाणे(पश्र्चिमयेथील जेकेकेमिकल कंपनीच्या क्रीडांगणावर (कॅडबरी कंपनीच्या समोर) आज दिनांक १९ मार्च ते २३ मार्च या कालावधी ही स्पर्धा होणार आहेत 

त्या स्पर्धेची गटवारी तांत्रिक समितीने जाहीर केलीया स्पर्धेत पुरुषांत सर्व संलग्न जिल्हा संघांचा सहभाग राहणार असल्याची माहिती आहे 

ओमप्रकाश मंडलेवाले यांच्या निवडी बद्दल विधमान आमदार डॉ तुषार राठोड,माजी आमदार हणमंतराव पाटील बेटमोगरेकर, तहसीलदार राजेश जाधव,मुखेड पोलिस ठाणेचे पोलिस निरीक्षक लक्ष्मण केंद्रे,बंडे मित्र मंडळ,MJPM क्रिकेट क्लब मुखेड यांच्या सह तालुकास्तरावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button