राजमाता जिजाऊ माँसाहेब आणि स्वामी विवेकानंद जयंती उत्साहात साजरी

मुखेड(प्रतिनिधी)
शिवश्री किड्स प्ले इंग्लिश स्कूल मुखेड येथे राजमाता माँसाहेब जिजाऊ यांची जयंती मोठ्या थाटामाटातसाजरी करण्यात आली.
सौ. सरस्वती विष्णकांत इंगोले यांच्या हस्ते प्रतिमेचे पुजन करुन जिजाऊ वंदना घेण्यात आली. शाळेतीलविद्यार्थी माँसाहेब जिजाऊंच्या तर काही विद्यार्थी स्वामी विवेकानंद व छत्रपती शिवाजी महाराजांच्यावेशभुषेत व काही विद्यार्थी मावळ्यांची वेशभूषा परिधान केली होती.
अत्यंत बिकट परिस्थितीमध्ये स्वराज्याची स्वप्ने व स्थापना करण्याची प्रेरणा छत्रपती शिवाजी महाराजयांना देऊन समतेचे स्वराज्य निर्माण करण्यात राजमाता जिजाऊ यांचे योगदान महत्वाचे आहे. आजच्याकाळातही राजमाता जिजाऊ यांचे विचार आणि कार्य तसेच स्वामी विवेकानंद यांचे विचारही समाजालाविधायक दिशा देत असल्याचे प्रतिपादन शाळेचे संचालिका सौ. सरस्वती इंगोले मॅडम यांनी केले.शिवश्री किड्स यांच्या प्ले इंग्लिश स्कूल मुखेड येथे राजमाता जिजाऊ व स्वामीविवेकांनद जयंतीचे आयोजनकरण्यात आले होते. या प्रसंगी राजमाता जिजाऊ यांच्या कार्याविषयी मतव्यक्त करताना ते पुढे म्हणाले की, आज अनेक क्षेत्रात महिला अग्रेसर दिसत आहेत. अनेक समस्यांना त्यांना सामोरे जावे लागते. यावेळी त्यांनीराजमाता जिजाऊ यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवणे आवश्यक आहे. छत्रपती शिवाजी महाराज व संभाजीमहाराज यांची वैचारीक, राजकीय, सामाजीक जडणघडण करण्यामध्ये राजमाता जिजाऊ यांचे विचारअत्यंत महत्वाचे असल्याचे त्यांनी नमूद करून राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या विचारांचावारसा पुढे चालविणे आवश्यक असल्याचेही सांगितले. आपल्या मुलावर संस्कार करतांना प्रत्येक आईनेराजमाता जिजाऊ यांचे विचार आणि चरित्र समोर ठेवणे आवश्यक आहे. स्वराज्याची स्थापना करण्यासाठीजिजाऊचे सातत्याने छत्रपती शिवाजी महाराज यांना मार्गदर्शन लाभले आहे.
आपल्या स्वराज्यात सर्व जातीधर्मातील सामान्य, शेतकरी, कष्टकरी, उपेक्षित लोकांना न्याय देत त्यांचाउत्कर्ष कसा साधला जाईल यासाठी त्यांनी वेळोवेळी स्वराज्यास मार्गदर्शन केले असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी इंगोले सर, इंगोले मॅडम यांनी प्रतिमा पूजन केले. यावेळी संचालिका सौ. सरस्वती इंगोले मॅडम, मुख्याध्यापिका सौ. स्मिता मुखेडकर, सौ. कुंदरुपे मॅडम, सौ. बादेवाड मॅडम, समरीन मॅडम, सौ. ताटे बाई* तसेच विद्यार्थी व पालक उपस्थित होते.



