मुखेड अभिवक्ता संघाच्या अध्यक्षपदी गोपाळ जाधव तर सिचवपदी गोविंद डुमणे

मुखेड प्रतिनिधी:-
मुखेड अभिवक्ता सघाची दि .२१ जानेवारी रोजी निवडणूक प्रिक्रया पार पडली असून अभिवक्ता संघाच्या विविवध पदासाठी झालेल्या अटीतटीच्या निवडणुकीत अध्यक्षपदी अँड. गोपाळराव जाधव, उपाध्यक्षपदीअँड. संदीप कामशेटे तर सिचवपदी अॅड. गोविंद डुमणे विजयी झाले आहेत. या विजयाबद्दल सर्वांचे सर्वस्तरातुन अभिनंदन होत आहे. मुखेड अभिवक्ता संघाच्या अध्यक्ष पदासाठी ॲड. गोपाळराव जाधव वॲड. शिवराज पाटील कंद्राळकर यांच्यात लढत झाली यामध्ये अॅड. जाधव यांनी त्यांचे प्रतिस्पर्धी अँड.शिवराज पाटील कुंद्राळकर यांचा पराभव करीत विजय मिळिवला आहे. तसेच उपाध्यक्ष पदासाठी ॲड. सुनिल पौळकर व अॅड. संदीप कामशेटे यांच्यात लढत झाली यात अॅड. पौळकर यांचा अॅड. कामशेट्टे यांनी पराभव करीत विजयी होण्याचा बहुमान प्राप्त केला आहे. त्याचबरोबर सचिव पदासाठी अॅड. बाबुराव जाधव व अॅड. गोविंद डुमणे यांच्यात लढत झाली असून यामध्ये अॅड. जाधव यांचा अॅड. डुमणे यांनी पराभव करत विजयी पताका रोवली आहे. सहसचिव पदासाठी अॅड. विक्की मुद्देवाड व अॅड. हणमंत होट्टे यांच्यात लढतझाली यात अॅड. मुद्देवाड यांनी अॅड. होट्टे यांचा पराभव करीत विजयी झाले आहे. त्याचबरोबर कोषाध्यक्षपदासाठी अॅड. प्रज्ञावंत गायकवाड व अॅड. अरूणा तेलंग यांच्यात लढत झाली असून यामध्ये अॅड. गायकवाड यांनी अॅड. तेलंग यांचा पराभव करुन विजयी होण्याचा मान पटकावला आहे. निवडणूक प्रक्रियाशांततेत व सुरळीत पार पाडण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी अॅड. कदम तसेच निवडणुक निर्णयअधिकारी अॅड. माधव मरकंठवाड यांनी काम पाहीले


