अधिक

घरकुल योजने’च्या कामात संथपणा: १५ अभियंत्यांच्या बदलीची शिफारस, नव्या अधिकाऱ्यांची मागणी

श्रमिक एकता न्यूज़ नेटवर्क मुखेड: १७ ऑक्टोंबर २६

पंचायत समिती अंतर्गत कार्यरत असलेल्या १५ ग्रामीण गृहनिर्माण अभियंत्यांच्या असमाधानकारक कामकाजामुळे आणि त्यांच्या विरुद्ध प्राप्त झालेल्या गंभीर तक्रारींची दखल घेत, त्यांच्या बदलीचे आदेश देण्यात आले आहेत. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा (नांदेड) ने या प्रकरणी कठोर भूमिका घेत, दि. १९ऑक्टोबर २०२६ रोजी राज्य व्यवस्थापन कक्ष–ग्रामीण गृहनिर्माण (मुंबई) यांना पत्र पाठवून या अभियंत्यांच्या जागी तातडीने नवीन अभियंते उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे.

संबंधित अभियंत्यांना यापूर्वी वारंवार आढावा बैठकांमध्ये काम सुधारण्याच्या सक्त सूचना देण्यात आल्या होत्या आणि ‘कारणे दाखवा‘ नोटिसाही बजावण्यात आल्या होत्या. मात्र, त्यांनी निर्धारित मुदतीत कोणताही खुलासा सादर न केल्याने मुखेड–कंधारचे आमदार डॉ. तुषार राठोड आणि गटविकास अधिकारी यांच्या पत्रव्यवहार व पाठपुराव्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत प्रतीक्षा आडे, सचिन पवार, वैभव राठोड यांच्यासह एकूण १५ अभियंत्यांचा समावेश आहे.

ग्रामीण भागातील ‘घरकुल योजनांची‘ प्रभावी अंमलबजावणी करणे, लाभार्थ्यांना मार्गदर्शन करणे आणि बांधकामावर देखरेख ठेवणे ही या अभियंत्यांची मुख्य जबाबदारी असते. आता वरिष्ठ प्रशासन यावर कायअंतिम निर्णय घेते आणि नवीन अभियंते आल्यावर रखडलेल्या घरकुल योजनांच्या कामाला किती गतीमिळते, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button