पैशांची खूप मस्ती आली का? तुला घरातून उचलेन आणि कपडे काढून मारेन;भाजप आमदाराची ऑडिओ क्लिप व्हायरल

नांदेड प्रतिनिधी:- १५ जुलै २५
भाजपचे नायगावचे आमदार राजेश पवार यांची अधिकाऱ्याला शिवीगाळ करतानाची एक क्लिप व्हायरल झाली आहे. नांदेडचे जिल्हा उपनिबंधक अशोक भिलारे यांना अश्लील शिवीगाळ करण्यात आली. नरसी सेवा सोसायटीत प्रशासक नेमणुकीवरून ही शिवीगाळ करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे.
गेल्या काही दिवसांपासून सत्ताधारी पक्षातील मंत्री आणि नेत्यांचे व्हिडीओ आणि ऑडिओ क्लिप व्हायरल होत आहेत. त्यामुळे सरकारमध्ये नेमकं चाललंय काय असा प्रश्न सामान्यांना पडला आहे. आमदार संजय गायकवाड आणि मंत्री संजय शिरसाट यांच्या व्हायरल झालेल्या व्हिडीओनंतर आता भाजपचे आमदार राजेश पवार यांची अधिकाऱ्याला शिवीगाळ केल्याची ऑडिओ क्लिप व्हायरल झालीआहे. आमदार राजेश पवार यांनी अत्यंत अश्लाघ्य शब्दांत उपनिबंधकांना शिवीगाळ केली असल्याचं याक्लिपमध्ये ऐकायला येत आहे.
श्रमिक एकता न्यूज़ ऑनलाईन या ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाहीये समाज माध्यमावर व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिपने एकच खळबळ उडाली आहे.


