मुखेड नपा ट्रॅक्टरच्या अपघात प्रकरणात १ वर्ष पूर्ण होऊनही तपास प्रलंबित; न्यायासाठी वारसांचा लढा

दिरंगाई करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करा पोलीस अधिक्षक, नांदेड यांच्याकडे नातेवाईकची मागणी
मुखेड प्रतिनिधी :-
मुखेड नगरपरिषदेच्या ट्रॅक्टरने झालेल्या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या राबीयाबी अहेमद बल्खी (वय ८०) यांच्या वारसाला नुकसान भरपाई मिळावी आणि तपासात दिरंगाई करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी पोलीस अधिक्षक, नांदेड यांच्याकडे अर्जाद्वारे करण्यात आली आहे.
२१ जानेवारी २०२४ रोजी मुखेड नगरपरिषदेच्या ट्रॅक्टरने निष्काळजीपणे वाहतूक करत वृद्ध महिलेस जोरातधडक दिली. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या बल्खी यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मात्र, याप्रकरणात मुखेड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यास टाळाटाळ करण्यात आली. पी.एस.ओ राठोड यांनीमनमर्जीप्रमाणे गुन्हा दाखल केल्याचा आरोप असून, अद्यापही संबंधित ट्रॅक्टर आणि चालकाचा शोधलागलेला नाही.
अर्जदार असद इब्राहीम बल्खी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, मुखेड पोलीस ठाण्यातील तपास अधिकारीजाणूनबुजून प्रकरण दाबून ठेवत आहेत. त्यांनी नगरपरिषदेच्या ट्रॅक्टरविषयी स्मरणपत्र पाठविल्याचेसांगितले, मात्र अद्याप कोणताही ठोस तपास झालेला नाही.
मोटार अपघात अधिनियम २०२३ नुसार, अपघातानंतर ६ महिन्यांच्या आत नुकसान भरपाईसाठी अर्जदाखल होणे आवश्यक असते. मात्र, या प्रकरणाला आता १ वर्ष पूर्ण होऊनही तपास प्रलंबित आहे. त्यामुळेमृत महिलेच्या कुटुंबाला नुकसान भरपाई मिळण्यास मोठा विलंब होत आहे.
तपास दिरंगाई करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करून, तातडीने मोटार अपघात प्राधिकरण व जिल्हान्यायालय, मुखेड येथे अर्ज दाखल करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी पोलीस अधिक्षकांकडे करण्यातआली आहे. तसेच, या प्रकरणाचा सखोल तपास करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशीहीमागणी मृत महिलेच्या कुटुंबीयांनी केली आहे.



