क्राईम

ऑटो अपघातात पिता ठार तर मुलगा जखमी

मुखेड प्रतिनिधी:-

मुखेड दि १८ फेब्रुवारी सायंकाळी ५.३० वाजता मुखेड चांडोळा वळण रोडवरील  भगनूरवाडी रस्त्या जवळ ऑटो पलटी होऊन यातील अकबर चांदसाब शेख (वय ७०राशिवाजीनगर तातुपरान जिमेदक(तेलंगानाहे  ठार झाले असून  मुलगा जखमी झाला आहे.

तुपरान जिमेदक येथील अकबर चांद शेख हे आपल्या परिवारासह मुखेड येथे लग्नाला आले होतेते परत हैद्राबादला देगलूर मार्ग जात होते.  त्यांचा मुलगा जफर हा गाडी चालवत होता अचानक समोरून मोटरसायकल आल्याने त्याला वाचवण्याच्या प्रयत्नांने ऑटोचा नियंत्रण सुटल्याने पलटी होऊन ऑटो खड्यात पडला हा अपघात मुखेड चांडोळा रोडवर भगनूरवाडी रस्त्याच्या वळणावर सायकाळी .३० च्यादरम्यान बाप आणि जफर शेख मुलगा हैद्राबाद येथे जात होते लग्नासाठी ते मुखेड येथे आले होते. मुलाला सुध्दा मार लागला असुन त्याचा प्राथमिक उपचार करण्यात आला आहे

शवविच्छेदन करून मयत त्यांच्या नातेवाईकांच्या हाती दिले आहे. दफनविधी ही शिवाजीनगर तातुपरान जिमेदक (तेलंगाना) येथे होणार आहे 

मयताचा पंचनामा पोका.वाय .व्ही इबीतवार यांनी केले शवविच्छेदन वैद्यकीय अधिकारी डॉपिएमदेशमुख यांनी केले. तर पुढील तपास पोहेकाएमपिगोन्टे हे करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button