मज्योफुले महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवानंद अडकिणे यांना उत्कृष्ट प्राचार्य पुरस्कार प्रदान

मुखेड /प्रतिनिधी:-
येथील वीरभद्र शिक्षण संस्था संचलित , महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवानंद अडकिणे यांना महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने करियर कट्टा उपक्रमांतर्गत नांदेड जिल्ह्यातील उत्कृष्ट प्राचार्य म्हणून द्वितीय पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे .
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री डी.पी.सावंत , उद्घाटक म्हणून स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ , नांदेडचे कुलगुरू डॉ. मनोहर चास्कर , प्रमुख पाहुणे म्हणून सहसंचालक डॉ. किरण बोन्दर , यशवंत शितोळे , प्राचार्य डॉ गणेशचंद्र शिंदे , प्रा.डॉ. डी.डी.पवार , प्रा.डॉ. सतीश चव्हाण , प्राचार्य डॉ. मोहन खताळ, प्राचार्य डॉ. बाळासाहेब जाधव, प्राचार्य डॉ. पंजाब चव्हाण हे उपस्थित होते . एकुणच महाविद्यालयात करियर कट्टा विभागाच्या वतीने आयोजित करण्यात येणाऱ्या विविध कार्याचा आढावा घेऊन सलग दुसऱ्यांदा नांदेड जिल्ह्यातील उत्कृष्ट प्राचार्य म्हणून डॉ. शिवानंद अडकिणे यांना माजी मंत्री डी.पी.सावंत व कुलगुरू डॉ. मनोहर चास्कर यांच्या हस्ते सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत द्वितीय पुरस्कार वितरण करण्यात आला . पुरस्कार स्विकारताना प्राचार्य डॉ. अडकिणे व करियर कट्टा समन्वयक डॉ. संतोष शेंबाळे हे उपस्थित होते .
या यशाबद्दल वीरभद्र शिक्षण संंस्थेचे अध्यक्ष श्रीकांत पाटील हंगरगेकर , उपाध्यक्ष सुभाषअप्पा शिवपुजे , सचिव रणजित पाटील हंगरगेकर , सहसचिव शंकरराव बसापूरे , कोषाध्यक्ष ओंकारअप्पा मठपती व सर्व संचालक मंडळ , महाविद्यालयीन परिवाराकडून शुभेच्छा देण्यात आले .



